Chehre Review : अमिताभ बच्चन-इम्रान हाश्मी यांच्या दमदार अभिनयानंतरही नाही चालली जादू, वाचा कसा आहे ‘चेहरे’ चित्रपट

अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी सोबत, रिया चक्रवर्ती, क्रिस्टल डिसूझा, अन्नू कपूर, सिद्धांत कपूर आणि धृतिमान चॅटर्जी यांच्यासह अनेक कलाकार 'चेहरे'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसले आहेत. (magic doesn't work even after Amitabh Bachchan-Imran Hashmi's energetic performance, read how is the 'Chehre' movie)

Chehre Review : अमिताभ बच्चन-इम्रान हाश्मी यांच्या दमदार अभिनयानंतरही नाही चालली जादू, वाचा कसा आहे 'चेहरे' चित्रपट
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 12:36 PM

कलाकार – अमिताभ बच्चन, इमरान हाश्मी, रिया चक्रवर्ती, अन्नू कपूर, क्रिस्टल डिसूझा दिग्दर्शक – रुमी जाफरी कुठे पाहू शकता – चित्रपटगृह

बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना चित्रपटगृहात पाहण्यासाठी चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. काही राज्यांमध्ये चित्रपटगृहं सुरू झाल्यानंतर चित्रपट प्रदर्शित होऊ लागले आहेत आणि आता अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी यांचा चित्रपट ‘चेहरे’ (Chehre) देखील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रुमी जाफरी यांनी केलं आहे. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक थ्रिलर-मिस्ट्री चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे, अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांचा ‘चेहरे’ हा चित्रपट कसा आहे ते पाहुया.

अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी सोबत, रिया चक्रवर्ती, क्रिस्टल डिसूझा, अन्नू कपूर, सिद्धांत कपूर आणि धृतिमान चॅटर्जी यांच्यासह अनेक कलाकार ‘चेहरे’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसले आहेत.

‘ही’ आहे चित्रपटाची कथा

‘चेहरे’चा ट्रेलर प्रचंड थ्रिलिंग होता मात्र चित्रपट त्यापेक्षा खूप वेगळा आहे. या चित्रपटाची कथा एक निवृत्त न्यायाधीश जगदीश आचार्य यांच्या डोंगरांनी वेढलेल्या घरापासून सुरू होते. निवृत्त गुन्हेगार वकील लतीफ झैदी (अमिताभ बच्चन), निवृत्त बचाव वकील परमजीत सिंग भुल्लर (अन्नू कपूर) हे त्यांचे मित्र आहेत. हे सर्व एकत्र खेळ खेळतात. ज्यामध्ये ते कोर्टासारखा खटला लढतात. यातील विशेष गोष्ट म्हणजे हे लोक आरोपींना निकाल देण्याबरोबरच शिक्षा देतात. यावेळी या खेळात इमरान हाश्मी त्यांचा आरोपी ठरतो. इम्रान हाश्मी हे एका जाहिरात कंपनीचे सीईओ आहेत जे वादळामुळे तिथे अडकलेत.

अमिताभ बच्चन आपल्या मित्रांसह इमरान हाश्मीसोबत हा गेम खेळतात. खेळ सुरू होण्यापूर्वीच अमिताभ सांगतात की आमच्या न्यायालयात न्याय नाही पण निर्णय आहे. मात्र इम्रान हा खेळ इतका गांभीर्यानं घेत नाही. टाइमपास म्हणून हा गेम खेळणाऱ्या इम्रान हाश्मीचं पुढे काय होईल, यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.

अभिनय

टीव्ही अभिनेत्री क्रिस्टल डिसूझानं या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर, क्रिस्टलला सौंदर्यानं प्रत्येकाची मनं जिंकण्यात यश मिळवलं आहे. त्याचबरोबर अमिताभ बच्चन, इम्रान हाश्मी आणि अन्नू कपूर यांचा अभिनयही जबरदस्त आहे. रिया चक्रवर्ती देखील चित्रपटात दिसली आहे मात्र तिचं पात्र व्यवस्थित दाखवलं गेलं नाही.

चित्रपटातील कमतरता

चित्रपटात उत्तम कलाकार असूनही हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात अपयशी ठरला आहे. कमकुवत कथेमुळे प्रेक्षकांची आवड हळूहळू कमी होऊ लागते आणि चित्रपट लांब वाटू लागतो. कथा थोडी मजबूत करून आणि वेळ कमी करून चित्रपट अधिक चांगला बनवता आला असता.

चित्रपट कोणी पाहावा

जर तुम्हाला कोर्टरूम ड्रामा बघायला आवडत असेल आणि अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांना एकत्र पाहायचं असेल तर तुम्ही हा चित्रपट बघायला जाऊ शकता.

चित्रपट कोणी पाहू नये

ट्रेलरच्या तुलनेत हा चित्रपट खूप वेगळा आहे. काही काळानंतर तुम्हाला कंटाळा येऊ शकतो. हा चित्रपट कमी वेळेत गुंडाळता आला असता. जर तुम्हाला थ्रिलर-गूढ चित्रपट आवडत नसेल तर तुम्ही हा चित्रपट वगळू शकता.

संबंधित बातम्या

200 Halla Ho Review : एक अशी कथा जिने समाजातील जातपात भेदभाव करणाऱ्यांना लगावली चपराक! वाचा कसा आहे रिंकूचा ‘200 हल्ला हो’

Shershaah Full Review : कारगिलमध्ये शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्राच्या शौर्याची कथा, वाचा कसा आहे ‘शेरशाह’ चित्रपट

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.