Antim : The Final Truth Review | ‘मुळशी पॅटर्न’ इतकाच मसाला सोबत सलमान भाईची दमदार अ‍ॅक्शन, वाचा कसा आहे ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’

बॉलिवूडचा ‘दबंग’ खान अर्थात अभिनेता सलमान खान याचा ‘अंतिम’ हा चित्रपट सुपरहिट मराठी चित्रपट 'मुळशी पॅटर्न 'चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. पुण्यातील सर्वात खतरनाक भूमाफिया बनलेल्या राहुल (आयुष शर्मा) या छोट्या शहरातील तरुणाची ही कथा आहे.

Antim : The Final Truth Review | ‘मुळशी पॅटर्न’ इतकाच मसाला सोबत सलमान भाईची दमदार अ‍ॅक्शन, वाचा कसा आहे ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’
Antim
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 10:46 AM

चित्रपट : अंतिम : द फायनल ट्रुथ

कलाकार : सलमान खान,आयुष शर्मा,महिमा मकवाना,सचिन खेडेकर,उपेंद्र लिमये

दिग्दर्शक : महेश मांजरेकर

कथा

बॉलिवूडचा ‘दबंग’ खान अर्थात अभिनेता सलमान खान याचा ‘अंतिम’ हा चित्रपट सुपरहिट मराठी चित्रपट ‘मुळशी पॅटर्न ‘चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. पुण्यातील सर्वात खतरनाक भूमाफिया बनलेल्या राहुल (आयुष शर्मा) या छोट्या शहरातील तरुणाची ही कथा आहे. या कथेत तो स्वतःसाठी अनेक शत्रू तयार करतो आणि कायदे देखील मोडतो. भूमाफियांकडून मारहाण होत असलेल्या आपल्या गरीब-साध्याभोळ्या वडिलांना अर्थात सत्याला (सचिन खेडेकर) वाचवण्यासाठी राहुल धावतो आणि मनाशी आता आपणही असंच बनायचं असा निर्धार करतो. त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीही या भूमाफियांनी काढून घेतलेल्या असतात.

अशा परिस्थितीत एका बेरोजगार तरुणाचे रूपांतर अतिशय खतरनाक अशा गुंडात होते. त्यानंतर त्याला पुण्यातील सर्वात प्रभावशाली गँगस्टर नान्या भाई (उपेंद्र लिमये) सोबत काम करायला लावले जाते. पण, यांच्यासमोर मोठी समस्या आहे ती म्हणजे पोलिस इन्स्पेक्टर राजवीर सिंग (सलमान खान), ज्याला शहरातील सर्व गुन्हे कसे संपवायचे हे बरोबर माहित आहे.

कसा आहे चित्रपट?

‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ हा चित्रपट महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला असून, त्यांनी एका गँगस्टरच्या कथेची मांडणी केली आहे. हा चित्रपट लोकांच्या मनोरंजनासाठी बनवण्यात आला आहे. मात्र, अ‍ॅक्शनचा काहीसा अभाव दिसून येत आहे. अ‍ॅक्शनपेक्षा संवाद जास्त आहेत आणि तेच या कथेत थोडा अडथळा निर्माण करतात. चित्रपटाच्या पूर्वार्धात कथानकात मोठे ट्विस्ट आहेत, जे उत्तरार्धात सर्व पात्रांची गती राखण्यास मदत करतात.

महेश मांजरेकर यांनी मोठ्या हुशारीने ग्रामीण आणि शहरी भागातील महाराष्ट्र पडद्यावर चितारला आहे. करण रावतच्या सिनेमॅटोग्राफीने शहराची स्थिर वाढ उत्तमरीत्या सादर केली आहे. लोकप्रिय मराठी कलाकारांना कास्ट केल्याने चित्रपटाला एक खास वजन आले आहे. तरीही चित्रपटात तोच संघर्ष पुन्हा पुन्हा दाखवून वॉच टायमिंग वाढवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. चित्रपटात एकूण चार गाणी असून, ती सुपरडुपर हिट ठरली आहेत.

सलमान खान पुन्हा एकदा त्याच्या पोलीस अवतारात परत आला आहे आणि तो निडर सरदाराची भूमिका साकारतो आहे. सलमान खान प्रत्येक चित्रपटात शर्ट फाडतो आणि गुंडांना चोप देतो, म्हणूनच त्याला पोलिस म्हणून चित्रित करणे खूप सोपे झाले आहे. आयुष शर्मा त्याच्या पिळदार शरीरयष्टीमुळे उठून दिसतो आणि सलमान खानसोबत बाँडिंग तयार करण्याचा प्रयत्न करतो. या चित्रपटात आयुष शर्माची मंदा (महिमा मकवाना) सोबत लव्ह केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे, जी खूपच नीरस वाटली आहे आणि अनेकदा चित्रपटाची गती थांबवते. महिमा मकवाना हिने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

..तर नक्की पाहा चित्रपट!

महेश मांजरेकर यांचा ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ मनोरंजन करतो, तसेच माफिया डॉनच्या जमिनी हडपण्याच्या मुद्द्यावर देखील भाष्य करतो. या माफिया डॉन्सची अनेकदा राजकारण्यांशी जवळीक असल्याने ते सहज कायदे मोडतात. जर, तुम्हाला जुन्या काळातील बॉलिवूड मसाला चित्रपट आवडत असतील, तर तुम्हाला हा चित्रपट आवडू शकतो. वास्तविक, जुन्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये अशा कथा आशयांना मोठ्या प्रमाणावर दाखवले जायचे. दुसरीकडे, सलमान खानच्या चाहत्यांना त्याला पोलिसांच्या गणवेशात गुन्हेगारांशी लढताना पाहायचे असेल, तर हा चित्रपट खास तुमच्यासाठीच आहे.

हेही वाचा :

Divorce | 2021मध्ये सेलिब्रिटी जोड्यांच्या नात्यात आला दुरावा, काहींचा झाला ब्रेकअप तर काहींचा घटस्फोट!

Happy Birthday Arjun Rampal | मॉडेल ते बॉलिवूड अभिनेता, दिल्लीतील एका पार्टीने बदललं अर्जुन रामपालचं आयुष्य!

काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.