मुंबई : अभिनेत्री राधिका मदन (Radhika Madan) आणि अभिनेता सनी कौशल (Sunny Kaushal) यांचा ‘शिद्दत’ (Shiddat) हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. चाहते या चित्रपटाद्वारे एक नवीन जोडी पाहणार आहेत. राधिका आणि सनी पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, आता जर तुम्ही आज हा चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर आधी हा चित्रपट कसा आहे जाणून घ्या….
चित्रपट : शिद्दत
स्टार कास्ट : राधिका मदन, सनी कौशल, मोहित रैना, डायना पेंटी
दिग्दर्शक : कुणाल देशमुख
एक तरुण मुलगा एका मुलीसाठी आपले आयुष्य बदलतो. त्याला वाटते की, ती त्याची सोलमेट आहे. पण त्याचा प्रवास समस्या, वास्तव तपासणी आणि एकतर्फी ध्यासांनी भरलेला आहे. त्याला आता हे प्रेम मिळेल की, तो प्रेमाच्या शोधात सर्व संपवेल?
चित्रपटात हे दाखवले जाते की जग्गी (सनी कौशल) जेव्हा कार्तिकाला (राधिका मदन) स्विमिंग पूलमधून बाहेर पडताना पाहतो, तेव्हा तो एकतर्फी प्रेमात पडतो. जग्गी कार्तिकाला प्रभावित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. आजच्या काळात, एक ध्येय वेडा माणूस मुलीच्या मागे अशा प्रकारे वेडा होतो की, तो तिचा नकार देखील स्वीकारत नाही. तथापि, लेखक श्रीधर राघवन आणि धीरत रतन यांनी कार्तिकाचे पात्र स्वतंत्र दाखवले आहे, जिला स्वतःची बाजू कशी घ्यावी, हे माहित आहे.
पूर्वार्धाची सुरुवात काहीशी हलकी आहे. यामध्ये नृत्य, प्रणय आणि इश्कबाजी दाखवण्यात आली आहे. पण मग हळू हळू कथा सस्पेन्स निर्माण करू लागते, ज्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटते की, या अशक्य प्रेमकथेचे पुढे काय होईल. दुसऱ्या भागात हळूहळू तुम्हाला कथेचा आनंद मिळेल.
चित्रपटाच्या मुख्य कलाकारांव्यतिरिक्त, इतर सहाय्यक कलाकार मोहित रैना आणि डायना पेंटी चित्रपटाच्या कथेला आणखी खुलण्यास मदत करतात. दोघांनी चांगली कामगिरी दाखवली आहे. पण काही ठिकाणी ते काहीसे नाटकी वाटतात.
सनी कौशलने या प्रियकर मुलाची भूमिका साकारली आहे. त्याने या पत्रात अनेक रंग भरण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याच्या करिअरचा आलेख आता वाढू शकतो. राधिकाने एका स्वतंत्र आणि निर्भीड मुलीची भूमिकाही साकारली होती. मोहित रैना त्याच्या पात्रासाठी योग्य होता, तर डायना पेंटीनेही उत्तम काम केले. पण तिच्या पात्राला अधिक जागा मिळाली असती, तर बरे झाले असते.
प्रेमकथेनुसार चित्रपटाचे संगीत सरासरी होते. तथापि, अमलेंदू चौधरीच्या उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीमुळे चित्रपटाचे व्हिजन स्पष्ट झाले.
जर, तुम्हाला प्रेमकथा पाहायला आवडत असेल आणि त्यात आधुनिक प्रेमाची जादू पाहायची असेल, तर हा चित्रपट तुमच्यासाठी योग्य आहे.