Thalaivii Review : कंगना रनौतच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट, वाचा चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या ‘थलायवी’बद्दल…

तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. चित्रपटांमध्ये संघर्ष करण्यापासून ते सुपरस्टार होण्यापर्यंत तामिळनाडूच्या राजकारणात ठसा उमटवण्यापर्यंत, जयललितांच्या आयुष्याने अनेक वळणे घेतली, ज्यात त्या स्वतः समाज आणि लोकांचा सामना करत होत्या. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) या शक्तिशाली स्त्रीची कथा मोठ्या पडद्यावर दाखवण्याची जबाबदारी स्वीकारली.

Thalaivii Review : कंगना रनौतच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट, वाचा चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या 'थलायवी'बद्दल...
Kangana Ranaut
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 3:09 PM

मुंबई : तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. चित्रपटांमध्ये संघर्ष करण्यापासून ते सुपरस्टार होण्यापर्यंत तामिळनाडूच्या राजकारणात ठसा उमटवण्यापर्यंत, जयललितांच्या आयुष्याने अनेक वळणे घेतली, ज्यात त्या स्वतः समाज आणि लोकांचा सामना करत होत्या. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) या शक्तिशाली स्त्रीची कथा मोठ्या पडद्यावर दाखवण्याची जबाबदारी स्वीकारली.

कंगना रनौतचा ‘थलायवी’ (Thalaivii)  उद्या म्हणजेच 9 सप्टेंबरला रिलीज होत आहे, कंगना रनौत या चित्रपटात जयललिताची भूमिका साकारत आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि राजकारणी एम जी रामचंद्रन यांच्याशी त्यांच्या नातेसंबंधापासून ते नंतर तामिळनाडूच्या सिंहासनावर रूढ होणाऱ्या जयललिता यांच्या आयुष्यातील अनेक पैलू या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. चित्रपटात एमजींची भूमिका ज्येष्ठ अभिनेते अरविंद स्वामी यांनी साकारली आहे.

चित्रपटाची कथा काय?

चित्रपटाची कथा एका मुलीपासून (कंगना रनौत) सुरू होते, जी एक अभिनेत्री आहे. ती अभिनेत्री म्हणजे जयललिता. जयललिता यांची एका गंभीर नसलेल्या अभिनेत्रीपासून देशातील एका शक्तिशाली स्त्रीमध्ये रुपांतर झाल्याची कथा यात चित्रित केली आहे. अशी ताकदवान महिला ज्यांना लोकांकडून खूप प्रेम मिळाले. लोक त्यांना प्रेमाने अम्मा म्हणत. या चित्रपटात जयललिता यांच्या तमिळनाडूच्या लोकांसाठी अम्मा बनण्याच्या संघर्षापासून झालेल्या परिवर्तनाचे चित्रण आहे. यामध्ये, जयललिता यांना त्यांच्या रील लाईफ हिरो एमजी रामचंद्रन (अरविंद स्वामी) यांच्याकडून सर्वाधिक पाठिंबा मिळाला. जयललिता आणि एमजी रामचंद्रन यांची केमिस्ट्री चित्रपटात अतिशय सुंदरपणे दाखवण्यात आली आहे.

चित्रपटाच्या पहिल्या भागात जयललितांचा संघर्ष आणि नंतर त्यांचा सुपरस्टार होण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. त्यांच्या आणि एमजी रामचंद्रन यांच्या प्रेमकथेवर या चित्रपटाचा बराच फोकस आहे. जयललिता जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आल्या, तेव्हा एमजी रामचंद्रन आधीच सुपरस्टार होते. पहिल्या भागात जयललितांचा स्वभाव आणि त्यांच्या निर्णयाचा त्यांच्या कुटुंबावर आणि करिअरवर होणारा परिणाम दाखवण्यात आला आहे.

चित्रपटाचा दुसरा भाग जयललितांच्या राजकीय कारकीर्दीवर आधारित आहे. एक महिला म्हणून त्यांचा स्वाभिमान आणि त्यांची राजकीय प्रतिस्पर्ध्यांशी त्यांचा लढा हा चित्रपट अधिक मनोरंजक बनवतो. विधानसभेत त्याच्यासोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेचाही चित्रपटात उल्लेख करण्यात आला आहे. जयललितांचा राजकारणातील वादग्रस्त प्रवेश आणि नंतर तामिळनाडूचे राजकारण आणि AIADMK मध्ये एक शक्तिशाली व्यक्ती म्हणून त्यांचा उदय हा खूप संघर्षमे प्रवास होता, जो चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

कंगनाचा हा चित्रपट का आहे पाहण्यासारखा?

जयललिता यांच्या चरित्राने त्यांच्याबद्दल सर्व काही माहिती जाहीर केली असली, तरी एका शक्तिशाली व्यक्तीबद्दल जाणून घेण्याची मजा मोठ्या पडद्यावर आणखीनच जास्त आहे. कंगना रनौतने ज्या प्रकारे चित्रपटात अभिनय केला आहे, तो अप्रतिम आहे. असे दिसते की, हा चित्रपट कंगना रनौतच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे आणि तिने या चित्रपटासाठी खूप मेहनत केली आहे. इतर कलाकारांचा अभिनय देखील हृदयाला स्पर्श करतो. त्याचबरोबर चित्रपटात असे अनेक संवाद आहेत, जे तुमचे खूप मनोरंजन करतील.

संवाद आणि सीन्स प्रभावी

चित्रपटाची मुख्य गोष्ट म्हणजे प्रेमकथा. चित्रपटात एक सीन आहे. एमजीआर आणि जयललिता यांना फोनवर एकमेकांशी बोलताना दाखवले आहे. त्यांच्या तोंडातून एक शब्दही निघत नाही, तर त्यांचे हृदय एकमेकांशी प्रेमाने बोलते, तुटलेल्या हृदयाची गोष्ट सांगते.

एवढेच नाही तर चित्रपटाचे संवादही खूप चांगले आहेत. एक संवाद आहे की, ‘महाभारतका दुसरा नाम जया है…’ हा संवाद जयललितांच्या जीवनाला अगदी परिपूर्ण पद्धतीने शोभतो. एका जागी प्रत्येकजण एमजीआरचे नाव घेत असतात, त्यांना कोणी ओळखत नाही, तेव्हा जयललिता म्हणतात की, ‘कृष्णा को सब पसंद करते थे, फिर भी राधा की सबमें गिनती नहीं होती.’ असे अनेक संवाद प्रेक्षकांना प्रभावित करू शकतात. हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहण्यासारखा आहे.

हेही वाचा :

Helmet Review : मजेदार पद्धतीने सामाजिक संदेश देण्याचा अपारशक्ती खुरानाचा प्रयत्न, मात्र अभिनयात पडला कमी

200 Halla Ho Review : एक अशी कथा जिने समाजातील जातपात भेदभाव करणाऱ्यांना लगावली चपराक! वाचा कसा आहे रिंकूचा ‘200 हल्ला हो’

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.