मुंबईत घडलेली ‘ती’ घटना कंगना रनौत यांच्या राजकारणात येण्याला ठरली कारणीभूत?

MP Kangana Ranaut : बीएमसीने कंगना रनौत यांच्या पाली हिल कार्यालयातील बेकायदेशीर बांधकामावर केलेली कारवाई... खासदार झाल्यानंतर कंगना यांनी सोडलं 'त्या' घटनेवर मौन... अभिनेत्रीने का केला आहे राजकारणात प्रवेश? चर्चांना सर्वत्र उधाण...

मुंबईत घडलेली 'ती' घटना कंगना रनौत यांच्या राजकारणात येण्याला ठरली कारणीभूत?
Follow us
| Updated on: Jun 14, 2024 | 10:32 AM

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत गेल्या काही दिवसांपासून प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदार संघातून निवडून आलेल्या कंगना यांच्याबद्दल अनेक चर्चा आता रंगत आहेत. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी कधीच राजकारणात प्रवेश करणार नाही… असं वक्तव्य खुद्द कंगना यांनी केलं होतं. आता नुकताच एका पॉडकास्टमध्ये कंगना यांनी राजकारणातील प्रवासाबद्दल सांगितलं. यावेळी मुंबईत त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेचा देखील त्यांनी उल्लेख केला. शिवाय राजकारणात येण्याचं कारण देखील कंगना यांनी सांगितलं.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत कंगना यांनी 2020 मध्ये घडलेल्या घटनेचा देखील उल्लेख केला. 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनांनंतर सर्वत्र खळबळ माजली होती. 2020 मध्ये मुंबईत सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी सुरू असताना कंगना रनौत आणि शिवसेना यांच्यात तणाव निर्माण झाला होता.

त्याचवेळी कंगना यांच्या घराचा काही भाग बीएमसीने पाडला होता. घराचा तो भाग बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्याचे बीएमसीने सांगितलं होतं. यावर कंगना म्हणाल्या, ‘आयुष्यात काहीही नवीन करण्याची माझी कल्पना कोणाबद्दलच्या कटुतेतून आलेली नाही.’

हे सुद्धा वाचा

कंगना पुढे म्हणाल्या, ‘मी माझ्या वक्तव्यावर आजही ठाम आहे….’ कंगना म्हणाल्या होत्या, ‘अमिताभ बच्चन यांच्यानंतर कोणाला सर्वात जास्त सन्मान मिळत असेल तर, तो सन्मान मला मिळत आहे.’ सध्या सर्वत्र कंगना यांची चर्चा रंगली आहे.

‘2020 मध्ये घडलेली ती घटना मला अपमानित करणारी होती. मला असं वाटलं माझ्यासोबत हिंसा होत आहे. हिंसक पद्धतीने माझं घर तोडलं. त्यावेळी मला तो वैयक्तिक हल्ला वाटला. तेव्हा मला अनेक लोकांचा पाठिंबा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. लोक म्हणाले मी साहसी आहे. देशाने मला साथ दिली…’ असं देखील कंगना म्हणाल्या…

कंगना यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्रीने मोर्चा राजकारणाकडे वळवळा. कंगना यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आहे विजयी झाल्या. मंडीच्या खासदार कंगना रनौत यांच्या नवीन प्रवासाची सुरुवात झाली आहे.

कंगना कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. वादाचा मुकूट कायम आपल्या डोक्यावर मिरवणाऱ्या कंगना आता राजकारणात उतरल्या आहेत. सोशल मीडियावर देखील त्यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर कंगना यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.