MS Dhoni Birthday : रील लाईफपेक्षा किती वेगळी धोनीची लव्हस्टोरी ? गर्लफ्रेंडशी भेट कशी झाली ?

महेंद्र सिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात त्याची लव्हस्टोरीदेखील दाखवण्यात आली होती. साक्षीला भेटण्यापूर्वी तो प्रियांका नावाच्या मुलीच्या प्रेमात होता, असे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. पण त्यांची लव्हस्टोरी कधीच पूर्ण होऊ शकली नाही.

MS Dhoni Birthday : रील लाईफपेक्षा किती वेगळी धोनीची लव्हस्टोरी ? गर्लफ्रेंडशी भेट कशी झाली ?
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 10:51 AM

Mahendra Singh Dhoni Love Story : अटीतटीच्या सामन्यातही मैदानावर डोकं शांत ठेवत सामान जिंकून देणाऱ्या कॅप्टन कूलचा अर्थात महेंद्रसिंग धोनीचा (Mahendra Singh Dhoni) आज म्हणजेच 7 जुलैला वाढदिवस (dhoni birthday) असतो. हेलीकॉप्टर शॉट, चपळ विकेटकिपिंग, हे सर्व धोनीचे बलस्थान आहे. 2011 साली भारताल दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकून देण्यात धोनीचा मोठा वाटा होता. भारताचा माजी कप्तान असलेला धोनी आज 42 वर्षांचा झाला आहे.

आज तो जे यश उपभोगतोय, त्याची जी वाहवा होतो, त्यासाठी त्याने कठोर मेहनत केली आहे. त्याचा हा जीवनप्रवास 2016 आलेल्या धोनी : द अनटोल्ड स्टोरी (dhoni movie) या बायोपिकमध्ये आपण सर्वांनीच पाहिला आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतने या चित्रपटात धोनीची भूमिका साकारली होती.

View this post on Instagram

A post shared by M S Dhoni (@mahi7781)

धोनी आणि प्रियांका ची स्टोरी

धोनीने कसा संघर्ष केला यासोबतच त्याची प्रेमकहाणीही चित्रपटात दाखवण्यात आली होती. साक्षी आणि त्याची भेट कशी झाली, त्यांचं प्रेम कसं फुललं, लग्न , वगैरे या सर्व गोष्टी चित्रपटात दाखवण्यात आले. मात्र साक्षीच्या आधी धोनीचे मन प्रियांका नावाच्या मुलीवर जडल्याचेही या चित्रपटात दाखवण्यात आले होते. मात्र त्यांची लव्हस्टोरी काही पूर्ण होऊ शकली नाही. पण प्रियांका आणि धोनीची जी स्टोरी चित्रपटात दाखवली ती पूर्णपणे योग्य नाही.

चित्रपटात काय दाखवलं ?

एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी चित्रपटात दाखवलं होतं की भारतीय क्रिकेट संघासोबत पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यासाठी धोनी प्रवास करत असताना फ्लाईटमध्ये त्याची व प्रियांकाची भेट झाली. प्रियांकाला सचिनचा ऑटोग्राफ हवा होता. धोनीने तिला ऑटोग्राफ मिळवून दिला, त्यानंतर त्या दोघांमध्ये बोलणं सुरू झालं.

आधीच्या सामन्यात कमी धावा केल्यामुळे पुढल्या सामन्यात आपल्याला खेळता येईल की नाही याची धोनीला चिंता वाटत होती. पण त्याला नक्की खेळता येईल आणि तो चांगली कामगिरी करेल, असा विश्वास प्रियांकाने व्यक्त केला. आणि तसंच झालं. त्या सामन्यानंतर धोनीने प्रियांकाला फोन केला, त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आणि प्रेम फुललं.

फेब्रुवारी 2006 मध्ये प्रियंका धोनीसाठी व्हॅलेंटाईन गिफ्ट खरेदी करण्यासाठी गेली होती. त्याच दरम्यान तिच्या कारचा अपघात झाला आणि त्या अपघातात तिला जीव गमवावा लागला, असं चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात ही कथा थोडी वेगळी आहे.

View this post on Instagram

A post shared by M S Dhoni (@mahi7781)

2002 साली झाली भेट आणि 2003 मध्ये झाला प्रियांकाचा मृत्यू

रिपोर्ट्सनुसार, पडद्यावर जे दाखवण्यात आलं त्या पेक्षा धोनी आणि प्रियांकाची लव्हस्टोरी थोडी वेगळी आहे. त्याची पहिली भेट 2005 साली नव्हे तर 2002 साली झाली होती, असं म्हणतात. तेव्हा धोनीचा भारतीय संघात समावेश झाला नव्हता. टीममध्ये जागा मिळवण्यासाठी तो कठोर मेहनत करत होता. प्रियांका व धोनीची भेट झाल्यावर ओळख वाढली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले, असं सांगितलं जातं. दोघांनी संपूर्ण आयुष्य एकत्र घालवायचं ठरवलं होतं, पण ते त्यांच्या निशाबात नव्हतं. 2003 साली झालेल्या अपघातात प्रियांकाचा मृत्यू झाला.

रिपोर्ट्सनुसार, प्रियांकाचा मृत्यू 2006 मध्ये नव्हे तर 2003 मध्ये झाला, जेव्हा धोनीची 2003-2004 च्या झिम्बाब्वे-केनिया दौऱ्यासाठी भारत अ संघात निवड झाली होती. त्या दौऱ्यात धोनीने 6 डावात 362 धावा केल्या, त्यानंतर तो सर्वत्र प्रसिद्ध झाला. मात्र, दौऱ्यावरून परतल्यावर त्याला प्रियांकाच्या निधनाची बातमी समजली, आणि तो कोसळून पडला. या दु:खातून बाहेर पडण्यासाठी धोनीला बराच काळ लागला होता.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.