Video | साक्षी म्हणाली ‘तमिळमध्ये अपशब्दसुद्धा माहीत आहेत’; धोनीचं उत्तर ऐकून उपस्थितांना हसू अनावर!

धोनी आणि साक्षी निर्मित 'लेट्स गेट मॅरीड' हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस किंवा 2024 या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये हरिश कल्याण आणि इव्हाना यांच्या मुख्य भूमिका आहेत. रमेश थमिलमणी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्यांनीच चित्रपटाला संगीतसुद्धा दिलं आहे.

Video | साक्षी म्हणाली 'तमिळमध्ये अपशब्दसुद्धा माहीत आहेत'; धोनीचं उत्तर ऐकून उपस्थितांना हसू अनावर!
MS Dhoni and SakshiImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 11:30 AM

चेन्नई : चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने नुकतंच निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. पत्नी साक्षी सिंहसोबत धोनी निर्माता बनला असून नुकतंच त्यांच्या पहिल्या प्रोजेक्टचा लाँच पार पडला. ‘लेट्स गेट मॅरीड’ या चित्रपटाचा ट्रेलर आणि ऑडिओ लाँच सोहळा सोमवारी चेन्नईत पार पडला. यावेळी पत्नी साक्षीसह धोनीने कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी साक्षी जेव्हा मंचावर पोहोचली, तेव्हा सूत्रसंचालकाने तिला काही मजेशीर प्रश्न विचारले. यावेळी साक्षीने दिलेलं उत्तर आणि त्यानंतर धोनीने केलेली सारवासारव याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

मंचावर आलेल्या साक्षीला सूत्रसंचालकाने तमिळ भाषेत काही बोलता येईल का असा प्रश्न विचारला. त्यावर ‘सेरी’ (ठीक आहे) आणि पोडा (निघून जा) असे शब्द म्हटल्यानंतर साक्षीने गंमतीत सांगितलं की तिला काही वाईट शब्दसुद्धा माहीत आहेत. त्यावर अधिक काही न बोलता ती मंचावरून खाली आली. यानंतर जेव्हा धोनी मंचावर बोलायला आला तेव्हा त्याने स्पष्ट केलं की त्याने साक्षीला कोणतेच अपशब्द शिकवले नाहीत. धोनीची ही मजेशीर प्रतिक्रिया ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

धोनीचं चेन्नईशी फार खास नातं आहे कारण आयपीएलमध्ये त्याच्या चेन्नई सुपर किंग्ज या टीमने पाच वेळा विजय मिळवला आहे. त्याचसोबत या कार्यक्रमात धोनीने गोलंदाज दीपक चहरसोबतच्या त्याच्या नात्याविषयीही फार मजेशीर वक्तव्य केलं. धोनीने चहरची तुलना ‘ड्रग्ज’शी केली आहे. तो म्हणाला, “दीपक चहर हा नशेसारखा आहे. जर तो तिथे नसेल तर तुम्ही विचार कराल की तो कुठे आहे. जर तो आजूबाजूला असेल तर तुम्हाला वाटेल की तो इथे का आहे? चांगली बाब ही आहे की तो हळूहळू परिपक्व होत आहे. पण त्याला आणखी काही वेळ लागेल. समस्या अशी आहे की मी माझ्या या आयुष्यात त्याला परिपक्व होताना पाहणार नाही (हसतो).”

धोनी आणि साक्षी निर्मित ‘लेट्स गेट मॅरीड’ हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस किंवा 2024 या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये हरिश कल्याण आणि इव्हाना यांच्या मुख्य भूमिका आहेत. रमेश थमिलमणी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्यांनीच चित्रपटाला संगीतसुद्धा दिलं आहे. यामध्ये नादिया, योगी बाबू आणि मिर्ची विजय हे कलाकारसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.