Mukesh Ambani: अँटिलियाचं ‘ते’ रहस्य, ज्यामुळे दीड वर्षांनंतर घरात शिफ्ट झालं अंबानी कुटुंब!

जगातील सर्वात महागड्या घरात अंबानी कुटुंब राहतं. त्यांच्या भव्य घराची कायम चर्चा रंगलेली असते... अंबानी कुटुंबच्या अँटिलियाचं मोठं सत्य तुम्हाला माहिती आहे?

Mukesh Ambani: अँटिलियाचं 'ते' रहस्य, ज्यामुळे दीड वर्षांनंतर घरात शिफ्ट झालं अंबानी कुटुंब!
Follow us
| Updated on: Jul 24, 2023 | 10:35 AM

मुंबई | 24 जुलै 2023 : जगातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी, पत्नी नीता अंबानी आणि अंबानी कुटुंबाची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते. अंबानी कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. जगातील सर्वात महागड्या घरात अंबानी कुटुंब राहतं. अंबानी कुटुंबाबद्दल जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. दक्षिण मुंबईत असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या भव्य घराचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. घरातील प्रत्येक वस्तू प्रचंड महागडी आहे. मुंबईत आलेल्या नव्या लोकांसाठी अँटिलिया केंद्रबिंदू आहे. अँटिलिया २७ मजल्यांची भव्य इमारत आहे. अँटिलियाचं बांधकाम २००४ साली सुरु करण्यात आलं.

अँटिलियाचं पूर्ण बांधकाम २०१० मध्ये पूर्ण झालं. पण घराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर देखील जवळपास दीड वर्षानंतर अंबानी कुटुंब नव्या घरात रहायला गेलं. ज्यामुळे अनेक चर्चे रंगल्या. अँटिलिया तयार झालं असताना देखील अंबानी कुटुंबाने नव्या घरात गृहप्रवेश का केलं नाही… नक्की यामागे काय कारण आहे..

२०१० मध्ये बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अंबानी कुटुंबाने २०११ साली अँटिलियामध्ये प्रवेश केला. अंबानी कुटुंबाने दीड वर्षांनंतर अँटिलियामध्ये प्रवेश केलं, ज्यामुळे अनेक चर्चा रंगल्या. काही वास्तू अडचणींमुळे अंबानी कुटुंबाने दीड वर्षांनंतर नव्या घरात प्रवेश केला… असं अनेकदा सांगण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

अँटिलियामध्ये प्रवेश करण्यापूर्वी अंबानी कुटुंबाने मोठी पूजा देखील घातली होती. ज्यासाठी ५० पंडितांना बोलावण्यात आलं होतं. रिपोर्टनुसार, एका मुलाखतीत नीता अंबानी यांनी रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा असल्याचं सांगितलं आणि वास्तू शास्त्रांच्या अफवांना फेटाळून लावलं.

अँटिलिया बांधण्यासाठी मुकेश अंबानी यांनी २००२ मध्ये एका मुस्लीम चॅरिटेबल ट्रस्टकडून जमीन खरेदी केली होती. अंबानी कुटुंबाचं घर अँटिलियाची चर्चा कायम चहत्यांमध्ये आणि सोशल मीडियामध्ये रंगलेली असते. एवढंच नाही अनेक कौटुंबिक कार्यक्रम देखील अँटिलियामध्ये मोठ्या थाटात साजरे केले जातात. ज्यासाठी अनेक सेलिब्रिटी आणि उद्योजक अँटिलिया याठिकाणी उपस्थित राहतात.

काही दिवसांपूर्वी अंबानी कुटुंबात नव्या चिमुकलीचं आगमन झालं. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी नातीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. अंबानी कुटुंबाचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि पत्नी श्लोका मेहता यांनी दोन मुलं आहेत. ज्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

तर अंबानी कुटुंबातील मुलगी ईशा अंबानी यांना देखील जुळी मुलं आहेत तर, अनंत अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. प्रसिद्ध उद्योजकांची मुलगी राधिका मर्चेंड यांच्यासोबत अंबानी कुटुंबातील लहान मुलगा सप्तपदी घेणार आहेत. अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा झाला आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

Non Stop LIVE Update
उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन, ठाकरेंची जळजळीत टीका
उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन, ठाकरेंची जळजळीत टीका.
'दगा एक बार हो सकता है, बार बार...', नवनीत राणांचा बच्चू कडूंवर निशाणा
'दगा एक बार हो सकता है, बार बार...', नवनीत राणांचा बच्चू कडूंवर निशाणा.
भेटता कसले,हिम्मत असेल तर राजीनामा द्या; आव्हाडांचं दादांना खुल आव्हान
भेटता कसले,हिम्मत असेल तर राजीनामा द्या; आव्हाडांचं दादांना खुल आव्हान.
वेळ आली तर ठाकरेंसाठी तलवारीचे वार घेऊ... त्या बॅनर्सची का होतेय चर्चा
वेळ आली तर ठाकरेंसाठी तलवारीचे वार घेऊ... त्या बॅनर्सची का होतेय चर्चा.
मी कोल्हापूरचा, मला बदामाची गरज नाही; चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?
मी कोल्हापूरचा, मला बदामाची गरज नाही; चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?.
मी ओरिजनल,शेवटी ब्रँड हा ब्रँड, नवनीत राणांचा यशोमती ठाकूरांवर पलटवार
मी ओरिजनल,शेवटी ब्रँड हा ब्रँड, नवनीत राणांचा यशोमती ठाकूरांवर पलटवार.
मिटकरीला ना कोणता अधिकार, त्यांनी तोंड बंद ठेवाव, भाजप नेत्यान फटकारल
मिटकरीला ना कोणता अधिकार, त्यांनी तोंड बंद ठेवाव, भाजप नेत्यान फटकारल.
मोदींना आता राहुल गांधींना रामराम करावा लागेल, राऊत नेमकं काय म्हणाले?
मोदींना आता राहुल गांधींना रामराम करावा लागेल, राऊत नेमकं काय म्हणाले?.
गुन्हा आहे का?, लोकसभेतील 'त्या' घोषणेनंतर राऊतांकडून ओवैसींची पाठराखण
गुन्हा आहे का?, लोकसभेतील 'त्या' घोषणेनंतर राऊतांकडून ओवैसींची पाठराखण.
कुठला विषय शिकवता हे विचारण्याची गरज काय?,किशोर दराडेंनी कुणाला सुनावल
कुठला विषय शिकवता हे विचारण्याची गरज काय?,किशोर दराडेंनी कुणाला सुनावल.