मुकेश अंबानींच्या होणाऱ्या सुनेची संपत्ती किती? ‘या’ क्षेत्रात करते काम

अंबानींच्या कुटुंबात लवकरच सनईचौघडे वाजणार आहेत. मुकेश आणि नीता अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी लग्नबंधनात अडकणार आहे. बालपणीची मैत्रीण राधिका मर्चंटशी तो लग्न करणार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली.

मुकेश अंबानींच्या होणाऱ्या सुनेची संपत्ती किती? 'या' क्षेत्रात करते काम
Anant Ambani and Radhika MerchantImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 06, 2024 | 3:33 PM

मुंबई : 6 फेब्रुवारी 2024 | देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या पत्रिकेत 1 मार्चपासून 8 मार्चपर्यंत लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांची माहिती देण्यात आली होती. मुकेश आणि नीता अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानीने अमेरिकेतील ब्राऊन युनिव्हर्सिटीमधून उच्चशिक्षण घेतलं आहे. भारतात परत आल्यानंतर तो रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी काम करतोय. ‘डीएनए’च्या एका वृत्तानुसार, अनंत अंबानीची एकूण संपत्ती ही तब्बल 3,44,000 कोटी रुपये इतकी आहे.

अनंतची होणारी पत्नी कोण?

अनंत अंबानी हा राधिका मर्चंटशी लग्न करणार असून तीसुद्धा संपत्तीच्या बाबतीत तगडी टक्कर देते. राधिका ही प्रसिद्ध बिझनेसमन वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. राधिकाने न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधून पॉलिटिक्स आणि इकोनॉमिक्सचं शिक्षण घेतलं आहे. शिक्षणानंतर ती भारतात परतली आणि इथे सेल्स प्रोफेशनल म्हणून एका रिअल इस्टेट कंपनीच काम करतेय. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार राधिकाची एकूण संपत्ती ही आठ ते दहा कोटींच्या घरात आहे. तिचे वडील वीरेन मर्चंट हे प्रसिद्ध इंडस्ट्रियलिस्ट आहेत. ‘जीक्यू’ने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांची एकूण संपत्ती जवळपास 755 कोटी रुपये इतकी आहे. राधिकाने भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेतलं असून तिला नृत्याची खूप आवड आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या वर्षी अँटिलियामध्येच राधिका आणि अनंतचा साखरपुडा झाला होता. या साखरपुड्याला बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते. आता लग्नातही इंडस्ट्रीतील मोठमोठे सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची पत्नी आलिया भट्ट हे या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमात विशेष परफॉर्म करणार असल्याचंही कळतंय.

राधिक आणि अनंत हे एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. तिचा जन्म 18 डिसेंबर 1994 रोजी झाला. राधिका मर्चंटला स्विमिंगची विशेष आवड आहे. त्याशिवाय ती अनेकदा आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत ट्रेकिंगलासुद्धा जाते. तिला नवनवीन गोष्टी शिकायला आवडतं. त्याचप्रमाणे ती प्राणीप्रेमी सुद्धा आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या मैत्रीबद्दल लोकांना 2018 मध्ये समजलं. त्यावेळी सोशल मीडियावर दोघांचा एक फोटो व्हायरल झाला होता. ईशा अंबानीच्या साखरपुड्यानंतर काही दिवसांनी हा फोटो समोर आला होता.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.