Anant Radhika Wedding: आकाडा आला समोर, अंबानींच्या लग्नात अंदाजित इतक्या हजार कोटींचा खर्च

| Updated on: Jul 12, 2024 | 12:56 PM

Anant Radhika Wedding: अनंत - राधिका यांच्या लग्नाचा खर्च 70 - 80 कोटी नाही तर, इतक्या हजार कोटींचा खर्च, मुकेश अंबानी यांनी लहान मुलाच्या लग्नात केलाय पाण्यासारखा खर्च..., लग्नानंतर पुढील तीन दिवस रंगणार कार्यक्रम, सर्वत्र अनंत - राधिका यांच्या लग्नाची चर्चा...

Anant Radhika Wedding: आकाडा आला समोर, अंबानींच्या लग्नात अंदाजित इतक्या हजार कोटींचा खर्च
Follow us on

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी शुक्रवारी नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत. 12 जुलै रोजी अंनत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न होणार आहे. सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून अनंत – राधिका यांच्या लग्नापूर्वीच्या विधी सुरु होत्या. संगीत, हळदी आणि मेहंदी कार्यक्रमात सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. सप्तपदी होण्यापूर्वी अंनत आणि राधिका यांच्यासाठी खास पूजा ठेवण्यात आली आहे.

अंनत आणि राधिका यांच्या लग्नाची चर्चा संपूर्ण जगात होत आहे.  राधिका – अनंत यांच्या लग्नासाठी परदेशी पाहुणे देखील भारतात पोहोचत आहेत. अंनत आणि राधिका यांचं लग्न जगातील सर्वात महागड्या लग्नापैकी एक आहे. मुकेश अंबानी यांनी लहान मुलाच्या लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे.

आकाश आणि ईशा यांच्या लग्नाच्या तुलनेत अनंत अंबानी यांच्या लग्नात सर्वात जास्त पैसा अंबानी कुटुंबियांचनी केला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या पहिल्या प्री-वेडिंग सेरेमनीवर अंबानी कुटुंबाने अंदाजे 1,000 कोटी रुपये खर्च केले होते. हा सोहळा गुजरातमधील जामनगर येथे 1 ते 3 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला होता. या प्री-वेडिंग सेरेमनीसाठी बॉलीवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या स्टार्सनी सहभाग घेतला. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंगबद्दल सांगायचं झालं तर, सेरेमनीतं इटली याठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. दुसऱ्या प्री-वेडिंगसाठी देखील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पार्टी क्रुझमध्ये झाली होती. यामध्येही मनोरंजन आणि व्यवसाय जगतातील प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या.

तेव्हा अंबानी कुटुंबाने त्यांच्या पाहुण्यांसाठी 10 चार्टर फ्लाइट्स बुक केल्या होत्या. शिवाय त्यांची सोय लक्षात घेऊन 12 खाजगी विमानांची व्यवस्था करण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंबानी कुटुंबाने इटलीमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमावर अंदाजे 500 कोटी रुपये खर्च केले.

अशा प्रकारे अंबानी कुटुंबियांनी लग्नात जवळपास दीड कोटी रुपये खर्च केला. तर लग्नासाठी जवळपास 2 हजार कोटी रुपयांचा खर्च अंबानी कुटुंब करणार आहे… म्हणजे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात अंबानी कुटुंबियांनी साडे तीन कोटी रुपयांचा खर्च केल्याची माहिती समोर येत आहे.