दीपिकाच्या लेकीला भेटण्यासाठी पोहोचला देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती

गणेशोत्सव काळात रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. दीपिकाने 8 सप्टेंबर रोजी मुलीला जन्म दिला. फेब्रुवारी महिन्यात तिने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. शनिवारी 7 सप्टेंबर रोजी दीपिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

दीपिकाच्या लेकीला भेटण्यासाठी पोहोचला देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती
दीपिका पादुकोण, रणवीर सिंहImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 10, 2024 | 11:45 AM

अभिनेत्री दीपिका पादुकोणने 8 सप्टेंबर रोजी मुलीला जन्म दिला. लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका आणि रणवीर सिंह आई-बाबा बनले. डिलिव्हरीच्या दोन दिवस आधी दीपिका-रणवीर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर शनिवारी तिला एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रविवारी 9 सप्टेंबर रोजी दीपिकाने चाहत्यांना ‘गोड बातमी’ सांगितली. सोमवारी रणवीरची बहीण रितिका भवनानी तिच्या भाचीला पाहण्यासाठी रुग्णालयात जाताना दिसली होती. त्यानंतर आता रणवीर-दीपिकाच्या मुलीला भेटण्यासाठी देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती पोहोचली आहे.

रणवीर-दीपिकाच्या चिमुकल्या मुलीला भेटण्यासाठी मुकेश अंबानी रुग्णालयात पोहोचले आहेत. अत्यंत कडक सुरक्षेत त्यांची कार रुग्णालयाच्या ठिकाणी पोहोचल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रणवीर आणि दीपिका यांचं अंबानी कुटुंबीयांशी अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याला रणवीर आणि दीपिका आवर्जून उपस्थित होते. लग्नापूर्वीच्या विविध कार्यक्रमांनाही दोघांनी हजेरी लावली होती. दीपिकाने ज्या रुग्णालयात मुलीला जन्म दिला, ते रुग्णालयसुद्धा मुकेश आणि नीता अंबानी यांचं आहे.

हे सुद्धा वाचा

दीपिकाला मुलगी होताच रणवीरची मोठी इच्छा पूर्ण झाली. रणवीरने त्याच्या एका जुन्या मुलाखतीत ही खास इच्छा बोलून दाखवली होती. रणवीरला मुलगी हवी होती आणि अखेर त्याची ही इच्छा पूर्ण झाली आहे. मुलीच्या जन्मानंतर रणवीर आणि दीपिकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली. ‘बेबी गर्लचं स्वागत’ असं लिहित त्यांनी त्याखाली जन्मतारखेचा उल्लेख केला होता. या पोस्टवर बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. बाळाच्या जन्मानंतर दीपिका मार्च 2025 पर्यंत कामातून ब्रेक घेणार असल्याचं कळतंय. त्यानंतर ती ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाच्या सीक्वेलच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

बाळाच्या जन्मानंतर दीपिका आणि रणवीर नव्या घरात राहायला जाणार असल्याचं कळतंय. दीपिका-रणवीर हे त्यांच्या नव्या आलिशान घरात शिफ्ट होणार आहेत. हे घर अभिनेता शाहरुख खानच्या ‘मन्नत’ या बंगल्याच्या शेजारीच आहे. दीपिका-रणवीरने 2015 मध्ये गुपचूप साखरपुडा उरकला होता. त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी इटलीत लग्न केलं.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.