नीता अंबानी यांचा आलिशान मेकअप रुम; पहिल्यांदाच समोर आला अँटिलियामधील खास व्हिडीओ

नीता अंबानी यांची लाइफस्टाइल कशी आहे, श्रीमंत घरातील लोक कसे राहतात, त्यांचा दिनक्रम कसा असतो, परंपरांचं कसं पालन करतात, याविषयी जाणून घेण्यासाठी सर्वसामान्य जण नेहमीच उत्सुक असतात. नुकताच नीता अंबानी यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

नीता अंबानी यांचा आलिशान मेकअप रुम; पहिल्यांदाच समोर आला अँटिलियामधील खास व्हिडीओ
Nita AmbaniImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 02, 2023 | 6:44 PM

मुंबई : 2 नोव्हेंबर 2023 | रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांनी नुकताच आपला 60 वा वाढदिवस साजरा केला. या वयातही नीता अंबानी सुंदरतेच्या बाबतीत अनेक तरुण अभिनेत्रींना मात देतात. त्यांचा ड्रेसिंग सेन्सपासून त्यांच्या वागण्या-बोलण्याची पद्धत अनेकजण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. इतकंच नव्हे तर त्यांचं साड्यांचं कलेक्शन पाहण्याजोगं आहे. नीता अंबानी या त्यांच्या पती आणि मुलांसोबत अँटिलिया बंगल्यात राहतात. देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीचं घर आतून कसं दिसतं, हे पाहण्याची अनेकांनाच उत्सुकता असते. आता नीता अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त पहिल्यांदाच त्यांच्या मेकअप रुमचा व्हिडीओ समोर आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नीता अंबानी यांच्या वाढदिवसाचा आहे. मेकअप आर्टिस्ट मिकी कॉन्ट्रॅक्टरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यामध्ये नीता यांच्या मेकअपच्या सर्व गोष्टी पहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या ब्रँड्सचे परफ्युम्स, फोटो फ्रेम, मेकअपचे इतर सामान, मोठा आरसा असं सर्वकाही यात दिसत आहेत. व्हिडीओमध्ये नीता यांची होणारी पत्नी राधिका मर्चंटसुद्धा दिसतेय.

हे सुद्धा वाचा

नीता अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यासोबत काम करणारे सहकारी त्यांची आरती करताना आणि शुभेच्छा देताना दिसत आहेत. इतकंच नव्हे तर काही जण नीता यांच्या पायांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतानाही दिसत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. नीता अंबानी या त्यांच्या सहकाऱ्यांसोबत अत्यंत प्रेमळ असल्याचं दिसून येत आहे, असं एकाने लिहिलं. तर सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट जाणवतोय, असं दुसऱ्यांनी म्हटलं आहे.

देशातील सर्वात मोठे उद्योजक मुकेश अंबानी यांच्या पत्नी आणि बिझनेस वुमन नीता अंबानी या त्यांच्या लाइफस्टाइलसाठी ओळखल्या जातात. पण अनेकदा त्यांचा साधेपणा भावून जातो. साध्या तरुणीपासून ते अंबानी कुटुंबाची सून होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास सहज, साधा नव्हता. साधेपणा आणि कष्टाने त्यांनी या कुटुंबाला सांभाळलं आहे. मुकेश अंबानी यांच्या अनेक निर्णयात त्यांचा हात आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.