जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर कुठे आहे सलमान खान? पोलिसांनी भाईजानला दिल्या ‘या’ सूचना

गँगस्टरच्या धमकीनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ, सध्या कुठे आहे भाईजान? जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी अभिनेत्याला दिल्या अनेक सूचना

जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर कुठे आहे सलमान खान? पोलिसांनी भाईजानला दिल्या 'या' सूचना
सलमान खानला धमकी देणारा अटक
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 2:49 PM

मुंबई : गँगस्टरच्या धमकीनंतर अभिनेता सलमान खान चर्चेत आहे. कारण भाईजानला जीवे मारण्याची ई मेलच्या माध्यमातून दिली आहे. म्हणून वांद्रे येथील अभिनेत्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंट परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी लॉरेंस बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित ब्रार यांच्या विरोधात एफआरआय दाखल केली आहे. शिवाय पोलिसांनी सलमानला काही सूचना दिल्या आहेत. ज्यामुळे सध्या सलमान खान कुठे आहे? याबद्दल कोणालाही माहिती नाही. सध्या सलमान मुंबई याठिकाणी नसून ‘किसी का भाई किसी की जान’सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा आहे. सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे.

सलमान खान सध्या मुंबईमध्ये नाही. तो पुन्हा कधी मुंबईमध्ये परतेल याची देखील माहिती कोणालाही नाही. अभिनेत्याची सुरक्षेची काळजी लक्षात घेत, जागेचा खुलासा करण्यात आलेला नाही. महत्त्वाचं म्हणजे, पोलिसांनी अभिनेत्याला आउटडोर शुटिंगला जाण्यास नकार दिली आहे. शिवाय कोणत्याही प्रमोशनल कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी अभिनेत्यावर बंदी घालण्यात आली आहे.

सलमान खान याच्यासोबतच अभिनेत्याच्या कुटुंबियांची देखील सुरक्षा वाढवली आहे. सलमान खान याचे वडील सलीन खान पूर्ण कुटुंबासोबत गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतात. गँगस्टरच्या धमकीनंतर गॅलेक्सी अपार्टमेंट परिसरात सुरक्षा वाढण्यात आली आहे. एवढंच नाही तर, भाईजानच्या कुटुंबाला विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

सलमानचा मॅनेजर प्रशांत गुंजलवारला धमकीचा एक ई-मेल मिळाला होता. या ई-मेलमध्ये सलमानशी चर्चा करण्याची मागणी करण्यात आली होती. हा ई-मेल रोहित गर्ग नावाच्या एका व्यक्तीने पाठवला होता. याप्रकरणी रोहित गर्ग, लॉरेंस बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या विरोधात एफआरआय दाखल केली आहे.

ई-मेलनंतर सलमानच्या मॅनेजरने मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाची गंभीरता पाहून पोलिसांनी IPC च्या कलम 506 (2), 120 (B), 34 अंतर्गत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित ब्रार यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे. त्याचसोबतच सलमानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

लॉरेंस बिश्नोई याने याआधी देखील एका व्हिडीओमध्ये सलमान खान याला धमकी दिली होती. लॉरेंस बिश्नोई याने अनेकदा सलमानला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आता देखील लॉरेंस बिश्नोई याने सलमान याला मारण्याची धमकी दिली आहे. म्हणून सलमानच्या पूर्ण कुटुंबाला सावध राहण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.