Salman Khan: सलमान खानच्या घरी पोहोचली मुंबई पोलीस; नेमकं काय आहे प्रकरण?
सलमान खानचे वडील सलीम खान यांना काही दिवसांपूर्वी सकाळी एक धमकीचं पत्र मिळालं होतं. तुमचंही सिद्धू मुसेवाला करू, अशी धमकी त्यात लिहिली होती. या पत्रानंतर सलमान आणि त्याच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली होती.
मुंबई पोलीस (Mumbai Police) अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरी पोहोचले आहेत. त्यांनी सलमानच्या घराचा आढावा घेतला आहे. ही नियमित प्रकिया (Routine Process) असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलीस तिथून निघून गेल्याचं म्हटलं जात आहे. मुंबई पोलिसांचं एक पथक लवकरच पंजाबला जात आहे. त्याठिकाणी ते सलमान खान प्रकरणाची चौकशी करणार आहेत. पंजाबी रॅपर आणि गायक सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या गुंडांनी सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
सलमान खानच्या घरी पोहोचले मुंबई पोलीस
सलमान खानचे वडील सलीम खान यांना काही दिवसांपूर्वी सकाळी एक धमकीचं पत्र मिळालं होतं. तुमचंही सिद्धू मुसेवाला करू, अशी धमकी त्यात लिहिली होती. या पत्रानंतर सलमान आणि त्याच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली होती.
सलमानच्या घराची रेकी करणाऱ्या कपिल पंडितला मुंबई पोलिसांनी नुकतीच अटक केली. पोलीस आता त्याची चौकशी करत आहेत. याबाबत माहिती देताना पंजाब पोलीसचे डीजीपी गौरव यादव म्हणाले, “चौकशीदरम्यान कपिल पंडितने कबूल केलं आहे की, सचिन बिश्नोई आणि संतोष यादव यांच्यासोबत त्याने लॉरेन्स बिश्नोईच्या सूचनेनुसार मुंबईत सलमानच्या घरी जाऊन रेकी केली होती. गोल्डी ब्रार या प्रकरणातील मास्टर माईंड आहे.”
सलमानला शस्त्र बाळगण्याची परवानगी
सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर त्याने आपल्या सुरक्षेसाठी शस्त्र बाळगण्याच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. पोलिसांकडून त्याला परवाना देण्यात आला. लॉरेन्स बिश्नोई सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहेत. दिल्ली पोलिसांनी सलमानच्या धमकीप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचीही चौकशी केली. मात्र त्याने साफ नकार दिला.