Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिचे गुपचूप फोटो क्लिक करणं दोन अज्ञात व्यक्तींना महागात पडलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी थेट आलिया हिच्यासोबत संपर्क साधला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आलियाला तक्रार दाखल करण्यास सांगितलं आहे. तर आलियाने पोलिसांना पीआर टीम संबंधित पोर्टलच्या संपर्कात असल्याचं सांगितलं आहे. सध्या आलिया या प्रकरणामुळे तुफान चर्चेत आहे. आलिया हिने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये एका पोर्टलने शेअर केलेला फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री तिच्या घरात बसलेली दिसत आहे. तर गुपचूप फोटो क्लिक केल्यामुळे अभिनेत्रीने फोटोग्राफर आणि पोर्टल विरोधातात नाराजी व्यक्त केली आहे. (Alia Bhatt social media)
सध्या आलियाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तर याप्रकरणी आलिया हिने मुंबई पोलिसांना टॅग केल्यानंतर पोलील ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. आता आलियाने गुपचूप फोटो क्लिक करणाऱ्यांविरोधात पोलीस काय कारवाई करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या पोलीस याप्रकरणी आलियाच्या संपर्कात आहेत. (alia bhatt photo controversy)
दोन व्यक्तींनी गुपचूप क्लिक केलेला फोटो पोस्ट करत आलिया म्हणाली, ‘तुम्ही मस्करी करताय का? मी माझ्या घरात लिव्हिंग रुममध्ये दुपारी निवांत बसले होते. तेव्हा मला जाणवलं की कोणीतरी मला पाहतंय. मी पाहिलं तर समोरच्या बिल्डिंगच्या टेरेसवरून दोन व्यक्ती माझ्याकडे कॅमेरा लावून पाहत होते… असं करणं कोणत्या जगात योग्य आहे…’ असा प्रश्न अभिनेत्रीने उपस्थित केला.
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘एखाद्याच्या खासगी आयुष्यात डोकावण्याची ही सर्वांत वाईट गोष्ट आहे. काही मर्यादा असतात, ज्या तुम्ही ओलांडू शकत नाही. तुम्ही आज सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत असं मला म्हणावं लागत आहे…’ अशाप्रकारे संताप व्यक्त करत आलियाने पोस्टमध्ये मुंबई पोलिसांनाही टॅग केलं आहे. सध्या आलियाची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. पोस्ट पाहिल्यानंतर अभिनेत्रींच्या चाहत्यांनी सेलिब्रिटींनी देखील संताप व्यक्त केला आहे.
अभिनेत्री आलिया भट्ट हिने आतापर्यंत अनेक हिट सिनेमे दिले आहेत. आता अभिनेत्री ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात आलिया हिच्या सोबत अभिनेता रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवया आलियाचा पहिला हॉलिवूड सिनेमा ‘हार्ट ऑफ स्टोन’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. (Alia bhatt film)