‘मुनव्वरने अनेक मुलींचा वापर केलाय, तर तू….’, सर्वांसमोर ईशा हिला असं का म्हणाला करण जोहर?
Bigg Boss 17 : ईशा हिने मुनव्वर याच्या खासगी आयुष्यावर प्रश्न उपस्थित करताच करण जोहर म्हणाला, 'मुनव्वरने अनेक मुलींचा वापर केलाय, तर तू....', असं का म्हणाला करण? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करण जोहर याच्याव वक्तव्याची चर्चा...

मुंबई | 16 जानेवारी 2024 : गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस 17’ तुफान चर्चेत आहे. सोशल मीडियावर देखील ‘बिग बॉस 17’ शोचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आता देखील सोशल मीडियावर बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये करण स्पर्धत ईशा मालवीय हिच्यावर संतापलेला दिसत आहे. मुनव्वर याची बाजू घेत करण याने ईशा हिला सुनावलं आहे. सध्या सर्वत्र करण याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये करण म्हणतो, ‘मुनव्वर अनेक मुलींचा वापर करुन त्यांना सोडून देतो… असं ईशा तू म्हणाली आहेस… तू मुनव्वर याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामध्ये जो रस दाखवला आहे, ज्यामुळे तुला असं वाटतं आहे की तू संपूर्ण भारताचं मन जिंकलं आहेस…’




View this post on Instagram
‘मुनव्वर याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याचं तुझ्याशी काय संबंध आहे… हे पूर्णपणे मुनव्वर याचं आयुष्य आहे. घरात कोणासोबत तुझं नातं चांगलं आहे, तू दुसऱ्यांच्या नत्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेस…’ असं देखील करण म्हणाला…
पुढे करण म्हणाला, ‘मी एक दिग्दर्शक आहे… मला निरागसता आणि निरागसतेचं केलेलं अभिनय कळतं…’ करण बोलत असताना ईशा फक्त गप्प ऐकत बसली होती. ईशा आणि करण यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी देखील व्हिडीओवर कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.
‘बिग बॉस 17’ मध्ये ईशा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ईशा सतत समर्थ जुरेल याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. दोघांचे अनेक रोमाँटिक व्हिडीओ देखील व्हायरल झाले. ईशा आणि समर्थ यांच्या नात्याला समर्थ यांच्या वडिलांचा पाठिंबा आहे, तर ईशा हिच्या वडिलांनी समर्थ याच्यापासून लांब राहा असा सल्ला लेकीला दिला आहे.
ईशा सतत तिच्या खासगी आयुष्यामुळे ‘बिग बॉस 17’ मध्ये चर्चेत आहे. फॅमिली विकमध्ये ईशा हिच्या वडिलांनी लेकीला सल्ला दिला होता. ‘पुढे खेळण्यासाठी तुला कोणाची गरज आहे का. सलमान सरांनी सांगितलं आहे त्या दोन लोकांपासून दूर राहा आणि स्वतःचा गेम खेळ… याठिकाणी इज्जत घालवायला आली आहे, की गमवायला…’ असं देखील ईशा हिचे वडील म्हणाले…