लग्न आणि प्रेग्नेंसीबाबत बबिताजीने केला मोठा खुलासा, म्हणाली अभिमानाने…

Munmun Dutta reveled : बबिताजीच्या नावाने प्रसिद्ध असलेली मुनमुन दत्ता सध्या तिच्या लग्नाच्या अफवांवरुन चर्चेत आहे. गेल्या दोन दिवसांपासून ती लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरु आहे. पण त्यावर तिने स्पष्ट नकार दिला आहे. त्यानंतर आज तिने पुन्हा एकदा लग्न आणि प्रेग्नेंसीबाबत खुलासा केला आहे.

लग्न आणि प्रेग्नेंसीबाबत बबिताजीने केला मोठा खुलासा, म्हणाली अभिमानाने...
Follow us
| Updated on: Mar 15, 2024 | 7:56 PM
Munmun Dutta : तारक मेहता का उल्टा चष्मा फेम बबिता जी अर्थात मुनमुन दत्ता गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अलीकडेच, मुनमुनचने गुपचूप साखऱपुडा केल्याची बातमी व्हायरल झाला होती. मालिकेतील टप्पू म्हणजेच अभिनेता राज अनाडकटशी तिचे लग्न होणार असल्याची अफवा पसरली होती. जो तिच्यापेक्षा नऊ वर्षांनी लहान आहे. यानंतर दोघांना यावर स्पष्टीकरण द्यावे लागले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुनमुन दत्ताने त्या सर्व अफवांवर एक पोस्ट देखील शेअर केलीये. तिने म्हटले आहे की जेव्हाही ती लग्न करण्याचा निर्णय घेईल तेव्हा ती अभिमानाने याबाबत सांगेल.

मुनमुन दत्ताने आज 15 मार्च रोजी तिच्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर अनेक स्टोरी शेअर केल्या आहेत. पहिला स्टोरीमध्ये ती म्हणते की, खोट्या बातम्या आगीसारख्या कशा पसरतात आणि बूमरँगसारख्या परत येतात हे खूप मजेदार आहे. मी पुन्हा स्पष्ट करते की, ना साखरपुडा, ना लग्न, ना गरोदर.

मी अभिमानाने लग्न करेन

मुनमुन दत्ताने तिच्या पुढच्या स्टोरीमध्ये लिहिले की, जर मला लहान किंवा मोठ्या मुलाशी लग्न करायचं असेल तर ते मी अभिमानाने करेन. माझ्याकडे बंगाली जीन्स आहेत, मला नेहमीच अभिमान आणि शूर वाटतो. आता खोट्या गोष्टींवर तुमची शक्ती वाया घालवू नका. जीवनातील चांगल्या गोष्टींकडे वळले पाहिजे.

कालही एक स्टोरी शेअर करताना मुनमुनने लिहिले होते, ‘फेक न्यूज सुरूच राहतील, माझ्या गर्ल गँगसोबत माझ्या संध्याकाळच्या चहाला कोणीही हरवू शकत नाही’.

याआधी २०२१ मध्ये त्यांच्या नात्याची बातमी सोशल मीडियावर आली होती, ज्यामध्ये शोच्या बाकीच्या लोकांनाही त्यांच्या नात्याबद्दल माहिती असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही मुनमुन दत्ता आणि राज अनाडकट यांनी त्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा आता राज भाग नाहीये. त्याने ही मालिका आधीच सोडली आहे. पण मुनमुन दत्ताला याच मालिकेमुळे मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. बबिता जी आणि जेठालाल यांची केमेस्ट्री यामध्ये पाहायला मिळाली आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.