‘टप्पू’ नाही तर या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती ‘बबिता’?; ब्रेकअपनंतर संपवणार होती आयुष्य

‘तारक मेहता..’ या मालिकेत बबिताजी आणि टप्पूची भूमिका साकारणारे कलाकार मुनमुन दत्ता आणि राज अनाडकत यांनी साखरपुडा केल्याच्या चर्चांमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. बुधवारी संध्याकाळपासून मुनमुन आणि राज यांच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

'टप्पू' नाही तर या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती 'बबिता'?; ब्रेकअपनंतर संपवणार होती आयुष्य
मुनमुन दत्ताImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 14, 2024 | 1:32 PM

मुंबई : 14 मार्च 2024 | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. सध्या यामध्ये बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता आणि टप्पूची भूमिका साकारलेला अभिनेता राज अनाडकत यांच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा आहे. मात्र या चर्चा केवळ अफवा असल्याचं दोघांनीही स्पष्ट केलंय. अशा खोट्या बातम्यांवर प्रतिक्रिया देऊन मी माझी ऊर्जा वाया घालवू इच्छित नाही, असं मुनमुनने स्पष्ट केलंय. मात्र मुनमुनचं नाव एखाद्या अभिनेत्याशी जोडलं गेल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मुनमुन याआधीही तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे.

एकेकाळी मुनमुन ही अभिनेता अरमान कोहलीच्या प्रेमात होती. हे दोघं सीरिअस रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यांच्यामध्ये अनेकदा भांडणंही व्हायची. इतकंच नव्हे तर अरमानने मुनमुनवर हात उचलला होता, असा आरोपही झाला होता. या सततच्या त्रासामुळे मुनमुनने तिचं आयुष्य संपवण्याचाही विचार केला होता. हे सर्व दावे अभिनेत्री डॉली बिंद्राने केले होते. तिने सांगितलं होतं की मुनमुन आणि अरमान यांच्यात अनेकदा भांडणं व्हायची आणि जेव्हा वाद वाढायचा, तेव्हा अरमान मुनमुनवर हात उचलायचा. मात्र या सर्व आरोपांवर अरमान किंवा मुनमुनने कधीच मौन सोडलं नाही. किंबहुना मुनमुनने एकदा सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित अरमानसोबत तिचं नाव जोडल्याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला होता.

हे सुद्धा वाचा

मुनमुनने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं होतं, ‘अरमान कोहलीसोबत मी रिलेशिनशिपमध्ये असल्याच्या खोट्या बातम्या पसरवणं थांबवा. मी गेल्या काही वर्षांपासून या चर्चांवर काही प्रतिक्रिया देत नव्हती. कारण त्या आपोआप शांत होतील असं मला वाटलं होतं. मात्र असं झालं नाही. कोणीही उठून माझ्याबद्दल काहीही बोलतंय. अशा फेक बातम्या छापणं बंद करा, अन्यथा मला याविरोधात कोर्टाची पायरी चढावी लागेल.’

सध्या मुनमुनचं नाव राज अनाडकतशी जोडलं जातंय. राजने मालिकेत टप्पूची भूमिका साकारली होती. या दोघांच्या वयात नऊ वर्षांचं अंतर आहे. राजने ही मालिका सोडली असली तरी मुनमुन गेल्या 15 वर्षांपासून या मालिकेत काम करतेय. मालिकेत काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं म्हटलं गेलं होतं. या चर्चांवरही तिने राग व्यक्त केला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.