‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधील डॉ. सुमन आठवतेय? 21 वर्षांत बदललं इतकं रुप

'मुन्नाभाई एमबीबीएस'मधील डॉक्टर सुमन आठवतेय का? अभिनेत्री ग्रेसी सिंहने ही भूमिका साकारली होती. आता 21 वर्षांनंतर ग्रेसी कशी दिसते, ते पहा. मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी ग्रेसीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर ती बऱ्यापैकी सक्रिय असते.

'मुन्नाभाई एमबीबीएस'मधील डॉ. सुमन आठवतेय? 21 वर्षांत बदललं इतकं रुप
Gracy SinghImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 13, 2024 | 10:05 AM

मुंबई : 13 मार्च 2024 | मुन्नाभाई आणि सर्किट ही दोन नावं ऐकली की सर्वांत आधी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हाच चित्रपट डोळ्यांसमोर येतो. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या दोन चित्रपटांतील या भूमिका आजही लोकप्रिय आहेत. पहिल्या भागात अभिनेता संजय दत्त आणि अर्शद वारसी यांच्यासोबतच ग्रेसी सिंहनेही मुख्य भूमिका साकारली होती. ती या चित्रपटात डॉक्टर सुमनच्या भूमिकेत होती. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ संजूबाबाच्या करिअरला वळण दिलं नाही तर बॉक्स ऑफिसवरही तो सुपर डुपर हिट ठरला होता. आता 21 वर्षांनंतर संजय दत्त आणि अर्शद वारसी कसे दिसतात, हे सर्व सर्वांनाच माहीत आहे. मात्र ग्रेसी सिंह गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. इतक्या वर्षांत ग्रेसी सिंहचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

ग्रेसीने 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सर उठा कर जियो’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. याशिवाय तिने तेलुगू, पंजाबी, मल्याळम, कन्नड आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केलंय. ग्रेसी सिंहला खरी ओळख आणि मोठं यश हे ‘लगान’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटांमधूनच मिळाली. फार कमी लोकांना माहीत असेल की ग्रेसी ही उत्तम अभिनेत्रीसोबतच प्रोफेशनल भरतनाट्यम डान्सरसुद्धा आहे. तिने चित्रपटांसोबतच टीव्ही इंडस्ट्रीतही काम केलंय. 1997 मध्ये तिने ‘अमानत’ या मालिकेसाठी ऑडिशन दिलं होतं आणि त्यात तिची निवडसुद्धा झाली होती. ग्रेसीने अजय देवगणसोबत ‘गंगाजल’मध्येही काम केलंय.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Gracy Singh (@iamgracysingh)

ग्रेसी सिंहमध्ये नायिकेत असावे असे सर्व गुण होते, परंतु एक-दोन चित्रपट फ्लॉप होताच तिला काम मिळणं बंद झालं. आपली कारकीर्द सुरु राहावी म्हणून 2008 मध्ये तिने कमाल आर. खान म्हणजेच केआरकेच्या ‘देशद्रोही’ चित्रपटातही काम केलं होतं. जेव्हा ग्रेसीला चित्रपटांमध्ये यश मिळालं नाही, तेव्हा ती छोट्या पडद्याकडे वळली. छोट्या पडद्यावरील ‘जय संतोषी मां’ या मालिकेत तिने काम केलं होतं. ग्रेसी सिंह आता पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास दीड लाख फॉलोअर्स आहेत. ग्रेसी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असून चाहत्यांसोबत ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.