Karisma Kapoor : ‘तेव्हा फक्त मनाचं ऐकलं म्हणून…’, आयुष्यात घडलेल्या गोष्टींवर करिश्मा कपूर व्यक्त
Karisma Kapoor : करिश्मा कपूर गेल्या काही वर्षांपासून अभिनय विश्वापासून दूर आहे. पण आता अभिनेत्री 'मर्डर मुबारक' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.... नुकताच अभिनेत्री भूतकाळातील घडलेल्या गोष्टींवर खंत व्यक्त केली आहे... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्मा कपूर हिची चर्चा रंगली आहे.
मुंबई | 13 मार्च 2024 : अभिनेत्री करिश्मा कपूर बॉलिवूडच्या सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय नावांपैकी एक आहे. अभिनेत्रीने बॉलिवूडला एकापेक्षा एक सिनेमे दिले आहेत. एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्मा कपूर हिच्या सिनेमांची आणि सौंदर्याची चर्चा होती. करिश्मा आता पूर्वीप्रमाणे अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी, तिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. अनेक वर्षांनंतर करिश्मा आता ‘मर्डर मुबारक’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या अभिनेत्री सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या करियरमध्ये आलेल्या उतार – चढावांबद्दल सांगितलं आहे. प्रमोशनदरम्यान करिश्माला, ‘आताच्या घडीला तुला बॉलिवूडमधील कोणते बदल तुला जाणवत आहेत..’ या प्रश्नाचं उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, ‘खरं सांगायचं झालं तर, प्रत्येक गोष्ट बदलली आहे. तेव्हा आम्ही फक्त मनाने विचार करायचो. कोणत्याच गोष्टीचा हिशेब ठेवत नव्हतो…’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘तेव्हा आमच्याकडे कोणती पीआर टीम नव्हती. कोणी स्टायलिश नव्हता.. सर्वकाही आमचं आम्ही करायचो. सेटवर जायचो आणि शुटिंग सुरु करायचो… तेव्हा काय करायला हवं, काय करायला नको… याबद्दल कोणी आम्हाला सांगायला नव्हतं. मनात काम करण्याची जिद्द होती म्हणून काम करायचो..’
आजच्या सिनेमांबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘एखाद्या सिनेमामुळे, गाण्यामुळे माझ्या करियरमध्ये मोठं बदल होतील… असा विचार करत मी कधीच काम केलं नाही. त्यामुळे मी आता मागे वळून पाहते तर, ‘हीरो नंबर 1’ सिनेमानंतर मी यशाच्या उच्च शिखरावर पोहोचली. त्यानंतर ‘राजा हिंदुस्तानी’ आणि ‘दिल तो पागल है’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
‘मर्डर मुबारक’ सिनेमा
‘मर्डर मुबारक’ सिनेमात करिश्मा कपूर हिच्यासोबत सारा अली खान, पंकज त्रिपाठी यांसारखे सेलिब्रिटी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन होमी अदजानिया यांनी केलं आहे. सिनेमा 15 मार्च 2024 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.
करिश्मा कपूर फक्त तिच्या खासगी आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. संजय कपूर याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्रीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता अभिनेत्री दोन मुलांचा सांभाळ ‘सिंगल मदर’ म्हणून करत आहे.