साजिद-वाजिद संगीतकारद्वयीतील वाजिद खान यांचे निधन
दबंग, पार्टनर, वॉन्टेड, एक था टायगर, मुझसे शादी करोगे अशा चित्रपटांतील गाजलेली गाणी साजिद-वाजिद यांनी संगीतबद्ध केली आहेत. (Music Composer Wajid Khan of famous duo Sajid-Wajid passed away)
मुंबई : बॉलिवूडमधील प्रख्यात संगीतकारद्वयी साजिद-वाजिद यांच्यापैकी वाजिद खान यांचे मुंबईत अकस्मात निधन झाले. मूत्रपिंडाच्या संसर्गामुळे उद्भवणार्या गुंतागुंतीमुळे त्यांचे निधन झाले. ते अवघ्या 42 वर्षांचे होते. (Music Composer Wajid Khan of famous duo Sajid-Wajid passed away) दबंग सिरीज, पार्टनर, वॉन्टेड, एक था टायगर, टायगर जिंदा है, गर्व, मुझसे शादी करोगे अशा चित्रपटांतील एकापेक्षा एक गाजलेली गाणी साजिद-वाजिद यांनी संगीतबद्ध केली आहेत.
वाजिद खान यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. गेले चार दिवस ते चेंबुरमधील रुग्णालयात व्हेंटिलेटरवर होते. त्यांची कोविड चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
तबलावादक उस्ताद शराफत अली खान यांचे दोन पुत्र साजिद-वाजिद यांनी अल्पकाळात मनोरंजन विश्वात नाव कमावले. 1998 मध्ये साजिद-वाजिद यांनी सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ चित्रपटाला संगीत देऊन बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर चोरी चोरी, हॅलो ब्रदर, मुझसे शादी करोगी, पार्टनर, वॉन्टेड आणि दबंग अशा सुपरस्टार सलमानच्या चित्रपटांसाठी त्यांनी अनेक अल्बम बनवले. सलमानच्या ‘भाई भाई’ गाण्याला दिलेली धून वाजिद यांची अखेरची प्रसिद्ध गीतमाला ठरली.
गायक म्हणून वाजिद खान यांनी 2008 मध्ये पार्टनरसाठी पहिले गाणे गायले. “हुड हुड दबंग”, “जलवा”, “चिंता ता चिता चिता” आणि “फेव्हीकॉल से” यासारखे ट्रॅक त्यांनी लोकप्रिय केले.
संगीतकार सलीम मर्चंट यांनी वाजिद खान यांच्या निधनाने मोठा धक्का बसल्याच्या भावना ट्विटरवरुन व्यक्त केल्या आहेत.
Devastated with the news of the passing away of my brother Wajid of Sajid -Wajid fame. May Allah give strength to the family ?
Safe travels bro @wajidkhan7 you’ve gone too soon. It’s a huge loss to our fraternity. I’m shocked & broken .
Inna Lillahi wa inna ilayhi raji’un
— salim merchant (@salim_merchant) May 31, 2020
(Music Composer Wajid Khan of famous duo Sajid-Wajid passed away)
अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनेही वाजिद खान यांच्या खळाळत्या हास्याची आठवण जागवली.
Terrible news. The one thing I will always remember is Wajid bhai’s laugh. Always smiling. Gone too soon. My condolences to his family and everyone grieving. Rest in peace my friend. You are in my thoughts and prayers.@wajidkhan7
— PRIYANKA (@priyankachopra) May 31, 2020
हेही वाचा : मनोरंजन विश्व पुन्हा रुळावर; चित्रपट-मालिकांच्या शूटिंगला सशर्त मान्यता
(Music Composer Wajid Khan of famous duo Sajid-Wajid passed away)