‘बाबुल का यह घर बहना’ गाण्यामागे दडलंय संगीतकाराचं दुःख; स्टुडिओत भावना आल्या दाटून आणि…

Bollywood | मुलीच्या पाठवणीच्यावेळी 'बाबुल का यह घर बहना' हे गाणं वाजतच... पण गाण्यामागे दडलं आहे संगीतकाराचं मोठं दुःख... स्टुडियोत संगीतकाराच्या डोळ्यात पाणी आलं, 'दाता' सिनेमातील 'बाबुल का यह घर बहना' गाणं तुम्ही ऐकलंच असेल, पण गाण्यामागचं रहस्य तुम्हाला माहिती आहे?

'बाबुल का यह घर बहना' गाण्यामागे दडलंय संगीतकाराचं दुःख; स्टुडिओत भावना आल्या दाटून आणि...
Follow us
| Updated on: Sep 23, 2023 | 8:10 PM

मुंबई : 23 सप्टेंबर 2023 | मुलीच्या पाठवणीच्या वेळी अनेक गाणी लग्नमंडपात वाजवली जातात. बॉलिवूडमध्ये देखील लग्न आणि लग्नासंबंधी विधींवर आधारित अनेक गाणी तयार करण्यात आली आणि अनेक हीट देखील झालं. अशाच गाण्यांपैकी एक म्हणजे ‘दाता’ सिनेमातील ‘बाबुल का यह घर बहना कुछ दिन का ठिकाना है’.. हे गाणं त्या काळी प्रचंड गाजलं. आज देखील ‘बाबुल का यह घर बहना कुछ दिन का ठिकाना है’ गाणं प्रसिद्ध आहे. 1989 साली प्रदर्शित झालेल्या ‘दाता’ सिनेमाने चाहत्यांचं मनोरंजन केलं. मुलगी सासरी जात असताना वडिलांच्या मनातील काय भावना असतील… हे गाण्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला. पण हे गाणं संगीतकाराच्या आयुष्याची निगडीत आहे.

‘दाता’ सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सुलतान अहमद यांच्यावर होती. सिनेमात मिथुन चक्रवर्ती, पद्मिमिनी कोल्हापुरे, शमी कपूर, सदीन जाफरी आणि प्रेम चोप्रा या प्रसिद्ध कलाकारांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सिनेमा लोकप्रिय होण्याचं आणखी एक कारण म्हणजे सिनेमात गाणी भरपूर होती. सिनेमाला म्यूझिक दिलं होतं लोकप्रिय भावांच्या जोडीने. लोकप्रिय भावांची जोडी म्हणजे आनंदजी आणि कल्याणजी…

‘बाबुल का यह घर बहना कुछ दिन का ठिकाना है’ गाण्याला प्लेबॅक किंग किशोर कुमार आणि अलका याज्ञिक यांनी आवाज दिला आहे. हे गाणं अंजान यांनी लिहिलं होतं. शिवाय सिनेमात लग्नापूर्वीच्या विधींचे अनेक सीन होते.  ‘बाबुल का यह घर बहना कुछ दिन का ठिकाना है’ अत्यंत भावनिक आहे.

हे सुद्धा वाचा

जेव्हा गाणं तयार करण्यात आलं तेव्हा, आनंदजी यांच्या मुलीचं लग्न झालं होतं आणि त्यांची मुलगी लंडनमध्ये होती. आनंदजी आणि त्यांच्या मुलीचं फार घट्ट नातं होतं. दरम्यान, आनंदजी यांची मुलगी गरोदर राहिली. तेव्हा आनंदजी यांनी मुलगी म्हणाली, ‘तुम्ही माझ्याकडे या…’ यावर आनंदजी म्हणाले आईला पाठवून देते. पण तेव्हा लेकीला वडिलांची गरज होती.

आनंदजी यांची मुलगी म्हणाली, ‘बाबा तुम्ही माझ्याकडे या… तुम्ही आल्यानंतर मला बरं वाटेल…’ पण कामामुळे आनंदजी यांचे पुढचे चार ते पाच महिने व्यस्त होते. तोपर्यंत त्यांच्या मुलीची डिलिव्हरी देखील होणार होती. तेव्हा त्यांची मुलगी म्हणाली, ‘तुम्ही माझ्यासाठी एवढं देखील नाही करू शकत का.. लग्न झाल्यानंतर मी तुमच्याकडून काही मागू देखील शकत नाही का?’

मुलीने केलेलं वक्तव्य ऐकून आनंदजी यांना प्रचंड दुःख झालं. यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि आनंदजी भावुक झाले. स्टुडिओत हे गाणं रेकॉर्ड होत असताना आनंदजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेव्हा हे पाठवणीचं गाणं तयार झालं… असं सांगण्यात येत..

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.