संगीतकार खय्याम यांना अभिनेता व्हायचं होतं, पण संगीतकार व्हावं लागलं
आज खय्याम यांचा वाढदिवस आहे, त्यामुळं आपण त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. त्यांना एखाद्या क्षेत्रात करिअर करायचं होतं, त्यामुळं त्यांनी लहानपणी आपल्या काकाचं दिल्लीतलं घर गाठलं.
मुंबई – संगीतकार मोहम्मद जहूर ‘खय्याम’ हाशमी (Mohammed Zahur Khayyam)यांचं नाव ऐकलं कानावर त्याचं संगीत पडतं किंवा त्यांनी ज्या गाण्यांना संगीत दिलं आहे. ती गाणी अनेकांना आठवतात, त्यांचा जन्म पंजाबमध्ये (punjab)स्वातंत्र्यपुर्व काळात झाला आहे. लहान असल्यापासून अभिनेता (actor) होण्याचं स्वप्न पाहणा-या खय्याम यांनी अभिनेता होण्यासाठी घरातून पळं काढला आणि दिल्ली (delhi)गाठली. त्यामुळं घरचे अत्यंत त्याच्यावर नाराज झाले. दिल्लीत काकांच्याकडे ते गेल्यावर घरच्यांना त्यांनी चित्रपटसृष्टीत जावं असं अजिबात वाटतं नव्हतं. तसेच खय्याम यांना अभिनेता व्हायचं असल्याने त्यांना घराकडं माघारी जायचं नव्हतं. त्यामुळं घरच्यांनी त्यांना संगीत शिक्षण घेण्याचं सांगितलं आणि ते खय्याम यांनी मान्य केलं. 1981 साली आलेल्या अनेक चित्रपटांना खय्याम यांनी संगीत दिलं आहे. तसेच त्यांनी ख्यातनाम संगीतकार असं नाव देखील कमावलं आहे. त्यांच्या करिअरला 1947 मध्ये सुरूवात झाली, त्यानंतर त्यांनी साधारण 5 वर्ष शर्माजी म्हणून गाण्याला संगीत दिलं. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी मुंबईतल्या एका रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
बाबा चिश्ती यांच्याकडे संगीत शिकण्यासाठी सुरूवात
आज खय्याम यांचा वाढदिवस आहे, त्यामुळं आपण त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. त्यांना एखाद्या क्षेत्रात करिअर करायचं होतं, त्यामुळं त्यांनी लहानपणी आपल्या काकाचं दिल्लीतलं घर गाठलं. तिथं गेल्यानंतर त्यांनी संगीत शिकण्याचं डोक्यात घेतलं. प्रसिद्ध संगीतकार हुसनलाल-भगतराम यांचे शिष्य म्हणून संगीत शिकतील असा घरच्यांनी निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी संगीत शिकण्याला सुरूवात केली. त्यावेळी बाबा चिश्ती यांचे चित्रपट क्षेत्रात चांगले संबंध होते. त्यामुळे खय्याशी यांनी बाबा चिश्ती यांच्याकडे संगीत शिकण्यासाठी सुरूवात केली. हा किस्सा त्यांनी दुरदर्शन वाहिनीला मुलाखत देत असताना सांगितलं आहे त्यामुळे त्यांच्या आयुष्यात त्यांना त्याकाळी किती संघर्ष करावा लागला असेल.
पगार मिळत नव्हता
पुर्वी एखादी गोष्ट करायची म्हणलं किंवा शिकायची जरी आपणं म्हणलं तरी त्या लोकांच्या घरी जाऊन आपल्याला त्यांची काम करावी लागत होती. त्यानंतर तो आपल्याला एखादी गोष्ट शिकवायचा. खय्याशी यांच्याही वाटयाला हा काळ आला होता. कारण त्यांचा काळ हा स्वातंत्र्यपुर्व काळ होता. त्यामुळे त्या काळात एखादी गोष्ट शिकण्यासाठी त्यांच्या घरी राहावं लागतं होतं. चिश्ती बाबांच्या घरी ज्यावेळी एकदा बी. आर. चोप्रा बाबा घरी आले त्यावेळी त्यांच्या खय्याशी हे अधिक काम करीत असताना चोप्रा यांनी पाहिलं, नंतर त्यांनी चिश्ती बाबांना विचारलं की या नोकराला किती पगार देता. त्यावर चिश्ती बाबा म्हणाले की त्याला संगीत शिकायचं असल्याने तो माझ्या घरची काम फुकत करणार असल्याचं सांगितलं. परंतु मी अधिक काम करीत असल्याने मला त्यावेळी चिश्ती बाबांनी 120 रूपये महिना पगार दिला. खय्याशी यांना खरंतर अभिनेता व्हायचं होतं, पण ते झाले संगीतकार, त्यांनी संगीत दिलेली गाणी आजही लोक आवडीने ऐकतात.