Alia Bhatt | ‘मी मेल्यावर कुटुंब आनंदी होईल’, आलिया भट्ट हिच्या जवळच्या व्यक्तीचं खळबळजनक वक्तव्य

'मी मेल्यावर कुटुंब आनंदी होईल', आलिया भट्ट हिच्या कुटुंबातील व्यक्तीच्या खळबळजनक वक्तव्याने कुटुंबियांना बसला मोठा धक्का... सर्वत्र अभिनेत्रीच्या कुटुंबाची चर्चा..

Alia Bhatt | 'मी मेल्यावर कुटुंब आनंदी होईल', आलिया भट्ट हिच्या जवळच्या व्यक्तीचं खळबळजनक वक्तव्य
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 12:48 PM

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि तिचं कुटुंब कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतं. पण आता अभिनेत्रीच्या कुटुंबातील एका व्यक्तीबद्दल खळबळजनक बाब समोर आली आहे. ज्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे.. ‘मी मेल्यावर कुटुंब आनंदी होईल…’ असं वक्तव्य आलिया भट्ट हिच्या कुटुंबातील एका सदस्याने केलं आहे. असं वक्तव्य करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्रीचे वडील आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांनी केलं आहे. महेश भट्ट कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत राहीले. एवढंच नाही तर, महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्ट देखील अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली होती. पूजा भट्ट सध्या ‘बिग बॉस ओटीटी’मुळे चर्चेत आहे. सांगयचं झालं तर महेश भट्ट यांचे दोन कुटुंब आहेत.

महेश भट्ट यांचे दोन कुटुंब अनेक कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात. पण सिमी ग्रेव्हाल यांच्या शोमध्ये महेश भट्ट यांनी कुटुंबाबद्दल मोठा खुलासा केला होता. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. शिवाय आपल्या वक्तव्यामुळे महेश तुफान चर्चेत देखील आले होते.

कुटुंबाबद्दल महेश भट्ट म्हणाले, ‘मी मेल्यावर माझं कुटुंब आनंदी होईल. कारण तुम्ही देखील ऐकलं असेल की, जेव्हा घरातील मुख्य सदस्याचं निधन होतं, तेव्हा कुटुंबियांमध्ये संपत्तीमुळे भांडणं होतात. पण माझं निधन झाल्यानंतर कुटुंबिय कायम आंनदी राहतील.. ही गोष्ट मला माहिती आहे…’

हे सुद्धा वाचा

पुढे महेश भट्ट म्हणाले, ‘ते आमचे वडील होते… आम्हाला त्यांची आठवण येते… मी कधीही त्यांना विसरु शकत नाही… असं मुलं काही दिवस म्हणतील. पण मनातून माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती प्रचंड आनंदी असेल… कारण मी त्यांच्यासाठी सोन्याची खाण सोडून जाणार आहे…’ असं देखील महेश भट्ट म्हणाले होतं…

महेश भट्ट कायम त्यांच्या दोन कुटुंबामुळे चर्चेत असतात. महेश भट्ट आणि पहिलं पत्नी किरण भट्ट यांना एक मुलगी आणि मुलगा आहे. त्यांच्या मुलाचं नाव राहुल भट्ट असं आहे. तर महेश भट्ट यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव सोनी राजदान असं आहे. सोनी राजदान आणि महेश भट्ट यांनी दोन मुली आहे. त्यांच्या मोठ्या मुलीचं नाव आलिया भट्ट असून, लहान मुलीचं नाव शाहीन भट्ट असं आहे…

पूजा भट्ट आणि आलिया भट्ट सावत्र बहिणी आहेत. पूजा भट्ट बिग बॉसच्या घतात तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगत असते. पूजा भट्ट ही महेश भट्ट यांची पहिली पत्नी किरण भट्ट यांची मुलगी आहे. शिवाय वडील महेश भट्ट यांच्यासोबत अनेक वादग्रस्त गोष्टींमुळे अभिनेत्री चर्चेत आली.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.