सर्वकाही ठीक असताना नेमकं कुठे बिनसलं? ‘मायलेक’च्या ट्रेलरला दमदार प्रतिसाद

| Updated on: Apr 06, 2024 | 2:04 PM

सोनाली खरे आणि उमेश कामत यांच्या भूमिका असलेल्या 'मायलेक' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट येत्या 19 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळतोय.

सर्वकाही ठीक असताना नेमकं कुठे बिनसलं? मायलेकच्या ट्रेलरला दमदार प्रतिसाद
Mylek movie trailer
Image Credit source: Youtube
Follow us on

‘मायलेक’ या नावावरूनच हा चित्रपट आई आणि मुलीच्या नातेसंबंधावर बेतलेला आहे, याची कल्पना आतापर्यंत सर्वांनाच आली असेल. रिअलमधील मायलेकींनी रिलमधील अनोखी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला असून हा एक कमाल कौटुंबिक चित्रपट असल्याचं दिसतंय. या ट्रेलर लाँच सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील अमृता खानविलकर, हर्षदा खानविलकर, संजय जाधव हे कलाकार उपस्थित होते. ट्रेलरमध्ये आई आणि मुलीचं घट्ट नातं दिसत असतानाच त्यांच्या या सुंदर नात्यात दुरावा येत असल्याचंही पहायला मिळतंय. आता हा दुरावा का येतोय, यात उमेशची भूमिका काय? या ‘मायलेक’ पुन्हा एकत्र येणार का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपटात मिळणार आहेत.

प्रियांका तन्वर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आई आणि मुलीचं सुंदर नातं ‘मायलेक’मधून उलगडणार असून हा चित्रपट येत्या 19 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

पहा ट्रेलर-

हे सुद्धा वाचा

या चित्रपटाबद्दल सोनाली खरे म्हणाली, ”हा चित्रपट प्रत्येक आई-मुलीची गोष्ट सांगणारा आहे. खूप संवेदनशील असं हे नातं आहे. हे नातं कधी मैत्रीचं असतं तर कधी एका वेगळ्याच वळणावर जातं. त्यामुळे हे नाजूक नातं उत्तमरित्या, विचारपूर्वक हाताळणं खूप गरजेचं आहे. ‘मायलेक’मधून कोणताही संदेश देण्यात आलेला नसून तुमच्या आमच्या घरातील ‘मायलेकी’ची ही जोडी आहे. ज्या धमाल, मजामस्ती करत आहेत. वाईट काळात मोठे निर्णय घेताना एकमेकींना साथही देत आहेत. त्यामुळे ‘मायलेक’ तुम्हाला विशेषतः आईमुलीला खूप जवळचा वाटेल. माझं आणि सनायाचं नातंही असंच आंबटगोड आहे. त्यामुळे पडद्यावर या व्यक्तिरेखा साकारणं सहज शक्य झालं. हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा आहे.”