‘Naagin 3’ फेम अभिनेता पर्ल पुरीला पोलिसांकडून अटक, काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या…

टीव्ही इंडस्ट्री गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) फेम अभिनेता करण मेहरा आणि त्याची पत्नी निशा रावल यांची केस काही दिवसांपासून चर्चेत होती की, आता एकता कपूरचा शो ‘नागीन 3’ फेम अभिनेता पर्ल पुरी (actor Pearl V Puri) बद्दल मोठी बातमी समोर आली आहे.

‘Naagin 3’ फेम अभिनेता पर्ल पुरीला पोलिसांकडून अटक, काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या...
पर्ल पुरी
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 10:56 AM

मुंबई : टीव्ही इंडस्ट्री गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) फेम अभिनेता करण मेहरा आणि त्याची पत्नी निशा रावल यांची केस काही दिवसांपासून चर्चेत होती की, आता एकता कपूरचा शो ‘नागीन 3’ फेम अभिनेता पर्ल पुरी (actor Pearl V Puri) बद्दल मोठी बातमी समोर आली आहे. पर्लला काल (5 जून) रात्री वसईमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. ‘नागीन 3’, ‘बेपनाह प्यार’ अशा मालिकांमध्ये काम केलेल्या पर्लवर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे आणि त्याच प्रकरणात अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे (Naagin 3 fame actor Pearl V Puri Arrested by Mumbai police).

बॉलिवूड बबलच्या अहवालानुसार, या महिलेने आणि तिच्या कुटुंबियांनी अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर 4 जून रोजी रात्री उशीरा पर्लला अटक करण्यात आली. पर्ल सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. याखेरीज अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. वेबसाईटच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांनी या संदर्भात पर्लशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा, अभिनेत्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

कसा वळला अभिनयाकडे?

पर्लने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, त्याच्या अभिनेता होण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे शाहरुख खान. त्याने सांगितले होते की, जेव्हा तो दहावीत होता, तव्हा त्याची गर्ल फ्रेंड शाहरूख खानची खूप मोठी फॅन होती. त्याच वेळी पर्लने निर्णय घेतला की, तो देखील अभिनेता होईल (Naagin 3 fame actor Pearl V Puri Arrested by Mumbai police).

संघर्षाच्या दिवसांची आठवण

काही दिवसांपूर्वी पर्लने एका शो दरम्यान सांगितले होते की, त्याच्या वडिलांनी वाटत होते की त्याने अभिनेता होऊ नये, म्हणून तो घरातून पळून गेला होता. त्यावेळी त्याच्याकडे काहीच पैसे शिल्लक नव्हते आणि तो भूक भागवण्यासाठी केवळ पाणी-पुरी खायचा. एकदा तर त्याने 9 दिवस काहीही खाल्ले देखील नव्हते.

पर्लची कारकीर्द

पर्लने 2013 मध्ये ‘दिल की नजर से खुबसुरत’ या शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. ‘फिर ना माने बदतमीज दिल से’ या शोमध्ये त्याला पहिली मुख्य भूमिका मिळाली. यानंतर तो ‘नागार्जुन एक योद्धा’ आणि ‘बेपनाह प्यार’मध्येही मुख्य भूमिकेत दिसला आहे. एकता कपूरच्या शो ‘नागीन 3’ मध्ये पर्लला सर्वाधिक पसंती मिळाली होती. सध्या पर्ल टीव्ही शो ‘ब्रह्मराक्षस 2’ मध्ये अंगद मेहराची व्यक्तिरेखा साकारत आहे.

(Naagin 3 fame actor Pearl V Puri Arrested by Mumbai police)

हेही वाचा :

‘5G’ प्रकरणात जुही चावलाला हायकोर्टाचा दणका, याचिका फेटाळत ठोठावला 20 लाखांचा दंड!

Sahkutumb Sahparivar : प्रेक्षकांचं प्रेम…, ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेनं पूर्ण केला 300 भागांचा टप्पा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.