Pearl Puri | अभिनेता पर्ल पुरीला जामीन मंजूर, बलात्काराच्या आरोपात झाली होती अटक
‘नागीन’ फेम अभिनेता पर्ल व्ही. पुरी (Pearl V Puri) याला आता जामीन मिळाला आहे. काल (4 जून) रात्री उशिरा टीव्हीचा लोकप्रिय अभिनेता पर्ल पुरी याला पोलिसांनी आयपीसी कलम सीआर आयपीसी 376 एबी, आर / डब्ल्यू पीओसीएसओ कायदा 4, 8, 12, 19, 21 अंतर्गत अटक केली होती
मुंबई : ‘नागीन’ फेम अभिनेता पर्ल व्ही. पुरी (Pearl V Puri) याला आता जामीन मिळाला आहे. काल (4 जून) रात्री उशिरा टीव्हीचा लोकप्रिय अभिनेता पर्ल पुरी याला पोलिसांनी आयपीसी कलम सीआर आयपीसी 376 एबी, आर / डब्ल्यू पीओसीएसओ कायदा 4, 8, 12, 19, 21 अंतर्गत अटक केली होती (Naagin 3 fame actor Pearl V Puri gets bail).
पर्लची खास मैत्रीण-अभिनेत्री करिश्ना तन्ना हिने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसमवेत ही माहिती शेअर करताना लिहिले की, “सत्यमेव जयते. सत्य नेहमीच जिंकतो आणि पर्ल जिंकला आहे.’ या पोस्टमध्ये, करिश्माने #IStandWithPearlPuri, #TruthNeverHides, #PVP सारख्या हॅशटॅगचा वापर केला आहे. अभिनेता पर्ल पुरी याला या संपूर्ण प्रकरणात केवळ जामीन मंजूर झाला आहे. अद्यापपर्यंत हे प्रकरण पूर्णपणे सुटलेले नाही. ‘नागीन 3’, ‘बेपनाह प्यार’ अशा मालिकांमध्ये काम केलेल्या पर्लवर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे आणि त्याच प्रकरणात अभिनेत्याला अटक करण्यात आली होती.
View this post on Instagram
बॉलिवूड बबलच्या अहवालानुसार, या महिलेने आणि तिच्या कुटुंबियांनी अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर 4 जून रोजी रात्री उशीरा पर्लला अटक करण्यात आली. पर्ल सध्या पोलिसांच्या ताब्यात होता, मात्र आता त्याला जामीन मिळाला आहे. याखेरीज अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. वेबसाईटच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांनी या संदर्भात पर्लशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा, अभिनेत्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही (Naagin 3 fame actor Pearl V Puri gets bail).
काय आहे प्रकरण?
वृत्तानुसार, एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि विनयभंग केल्याप्रकरणी पर्लला पोलिसांनी अटक केली होती. अहवालानुसार या मुलीचे वय 5 ते 7 वर्षाच्या दरम्यान आहे आणि म्हणून पर्लवर पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका पोर्टलनुसार मुलीच्या वडिलांनी दिलेल्या अनेक तक्रारींमध्ये असे लिहिले गेले आहे की, मुलीला पर्लबरोबर सेल्फी घ्यायची होती. त्यानंतर पर्ल तिला व्हॅनिटी व्हॅनमध्ये घेऊन गेला. आणि तिथे त्याने तिचा विनयभंग करून तिच्यावर बलात्कार केला.
दोन वर्षांपूर्वी घडला गुन्हा
टीव्ही 9ला मिळालेल्या विशेष माहितीनुसार, हे प्रकरण 2019-20चा आहे, जिथे पर्ल मुंबईला लागून वसई नायगाव दरम्यान त्याच्या सीरियलसाठी शूट करत होता. ज्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पर्लवर बलात्काराचा आरोप केला आहे, त्याची पत्नीदेखील या मालिकेचा एक भाग होती. ही मुलगी पर्लला त्याच्या ऑन-स्क्रीन नावाने ओळखत असे. ही तक्रार केवळ मुलीच्या वडिलांच्या वतीने दाखल करण्यात आली आहे. याबाबत आईकडून कोणतेही विधान आलेले नाही.
पर्लची कारकीर्द
पर्लने 2013 मध्ये ‘दिल की नजर से खुबसुरत’ या शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. ‘फिर ना माने बदतमीज दिल से’ या शोमध्ये त्याला पहिली मुख्य भूमिका मिळाली. यानंतर तो ‘नागार्जुन एक योद्धा’ आणि ‘बेपनाह प्यार’मध्येही मुख्य भूमिकेत दिसला आहे. एकता कपूरच्या शो ‘नागीन 3’ मध्ये पर्लला सर्वाधिक पसंती मिळाली होती. सध्या पर्ल टीव्ही शो ‘ब्रह्मराक्षस 2’ मध्ये अंगद मेहराची व्यक्तिरेखा साकारत आहे.
(Naagin 3 fame actor Pearl V Puri gets bail)
हेही वाचा :
Photo : ‘झूठ बिकता है..’, निया शर्मानं शेअर केला नो मेकअप फोटो
Must Watch Movies | ‘दिल बेचारा’ ते ‘शेप ऑफ वॉटर’, हॉटस्टारवरील ‘हे’ गाजलेले चित्रपट आवर्जून बघाच!