‘I Am Sorry’, प्रसिद्ध अभिनेत्याच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री का मागतेय माफी?
करियरला केली एकत्र सुरुवात, पण अभिनेत्याने साथ सोडल्यानंतर अभिनेत्रीने का मागितली माफी, 'आपण सोबत प्रवासाची सुरुवात केली, पण...', अभिनेत्रीच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा
मुंबई : तेलुगू अभिनेता सुधीर वर्मा याने सोमवारी (23 जानेवारी) आत्महत्या केली. विशाखापट्टणम इथल्या राहत्या घरी या अभिनेत्याने आत्महत्या केली. अभिनेत्याच्या आत्महत्येनंतर कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्याच्या निधनानंतर चाहते आणि मित्र परिवाराच्या मानात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान, अभिनेत्याच्या निधनावर एका प्रसिद्ध अभित्रीने दुःख व्यक्त केलं आहे. ‘नागिन’ मालिकेतील अभिनेत्री गायत्री अय्यर हिने सुधीर वर्माच्या आत्महत्येवर दुःख व्यक्त केलं आहे.
गायत्री अय्यर हिने इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली, ‘सुधीर आपण सोबत प्रवासाची सुरुवात केली. तू प्रचंड दयाळू, समजदार आणि विनोदी होतास. आपण दिवस रात्र शुट करायचो, पण तू कधीही कोणासाठी देखील एक वाईट शब्द बोल्ला नाहीस. असं म्हणत अभिनेत्रीने अभिनेत्यासोबत असलेल्या आठवणींना उजाळा दिला.
Sudheer! @sudheervarmak Such a lovely and warm guy’ It was great knowing you and working with you brother! Can’t digest the fact that you are no more! Om Shanti @iChandiniC @vara_mullapudi @anil_anilbhanu pic.twitter.com/Sw7KdTRkpG
— Sudhakar Komakula (@UrsSudhakarK) January 23, 2023
अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘मला एक सीन आठवत आहे. त्या सीनमध्ये सतत हसत होती. टेकवर टेक घेत होती. पण तू रागावला नाही, चिडला नाहीस… शांत उभा राहून हसत होतास.’ असं म्हणत अभिनेत्रीने सुधीर वर्माच्या आत्महत्येवर दुःख व्यक्त केलं आहे.
एवढंच नाही तर, अभिनेत्रीने सुधीर वर्माची माफी देखील मागितली, ‘मला माफ कर… मी कधी तुला या गोष्टी सांगितल्या नाहीत किंवा कधी तुझं कौतुक केलं नाही. एक उत्तम माणून, एक उत्तम अभिनेता, सह-कलातार. मला माफ कर आपण संपर्कात राहिलो नाही.’ असं म्हणत गायत्री अय्यर हिने सुधीर वर्मा याची माफी मागितली.
सुधीरने 2013 मध्ये ‘स्वामी रा रा’ या सिनेमातून करिअरची सुरुवात केली होती. मात्र त्याच्या या पदार्पणाच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नव्हतं. त्यानंतरच्या ‘कुंदनपू बोम्मा’ या सिनेमामुळे त्याला लोकप्रियता मिळाली. हा त्याच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट सिनेमा मानला जातो.
2022 मध्ये सुधीर याच्या ‘साकिनी दाकिनी’ या ॲक्शन-कॉमेडी सिनेमाला भरपूर यश मिळालं. यामध्ये त्याच्यासोबत निवेता थॉमस आणि रेगिना कॅसँड्रा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिडनाइट रनर्स’ या साऊथ कोरियन सिनेमाचा हा रिमेक होता.