Naatu Naatu : ऑस्कर जिंकल्यानंतर सर्वत्र ‘नाटू नाटू’ गाण्याचा बोलबाला; जगभरात रचला मोठा विक्रम
ऑस्करवर नाव कोरल्यानंतर 'आरआरआर' सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्याची जगभरात जादू; रचला मोठा विक्रम... सिनेमाला यश मिळाल्यानंतर एसएस राजामौली यांनी घेतला मोठा निर्णय
मुंबई : यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भराताचा बोलबाला पाहायला मिळाला. ९५ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात भारताने यंदा एक नाही तर, दोन पुरस्कारांवर नाव कोरलं आहे. ज्यामुळे कलाकार आणि भारतात आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ सिनेमातील ‘नाटू नाटू’ गाण्याने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. ओरिजिनल साँग (सर्वोत्कृष्ट मूळ गाणं) विभागात ऑस्कर पुरस्कार पटकावणारा हा पहिला भारतीय सिनेमा ठरला आहे. ऑस्कर जिंकल्यानंतर गाण्याची लोकप्रियता आणखी वाढली आहे. सध्या सर्वत्र ‘नाटू नाटू’ गाण्याची चर्चा आहे. ऑस्कर जिंकल्यानंतर गूगलवर ‘नाटू नाटू’ गाण्याचं सर्चिंग १,१०५ टक्क्यांनी वाढली आहे.
जापानी ऑनलाइन कॅसीनो गाइड 6Takarakuji यांच्यानुसार, तेलुगू सिनेमा RRR च्या ‘नाटू नाटू’ने ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर काही तासांतच या गाण्याच्या सर्च करण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. सध्या जगभरात नाटू नाटू गाण्याचा बोलबाला पाहायला मिळत आहे. ऑस्कर जिंकल्यानंतर सिनेमा नवीन विक्रम रचताना दिसत आहे.
6Takarakuji च्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी नाटू नाटू गाणं प्रदर्शित झाल्यानंतर टिक – टॉकवर गाण्याला २.६ मिलियन व्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर सर्वत्र नाटू नाटू गाण्याचा बोलबाला आहे. एवढंच नाही तर, अनेकांनी नाटू नाटू गाण्यावर व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
View this post on Instagram
नाटू नाटू प्रदर्शित झाल्यापासून गाण्याने अनेकांना आपल्या तालावर थिरकायला लावलं. एवढंच नाही तर, ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात देखील गायक राहुल सिप्लिगुंज आणि काल भैरव यांनी नाटू नाटू गाण्यावर ताल धरला. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदाच्या वर्षी भारताचा बोलबाला पाहयला मिळाला.
RRR सिनेमातील नाटू नाटू गाण्याने जगभरात प्रत्येकाला वेड लावलं आहे. जेव्हा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नाटू नाटू मंचावर सादर करण्यात आलं तेव्हा त्याला स्टँडिंग ओव्हेशन मिळालं. पुरस्कार सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
सांगायचं झालं तर, दिग्दर्शक एसएस राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ सिनेमा २०२२ मध्ये प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने मोठी कमाई केली. फक्त भारतातच नाही तर, जगभरात सिनेमाने नवीन विक्रम रचला. रिपोर्टनुसार, ‘आरआरआर’ सिनेमाला यश मिळाल्यानंतर एसएस राजामौली यांनी ‘आरआरआर’ सिनेमाच्या सिक्वलवर काम करण्यास सुरुवात केली आहे.