घटस्फोटानंतर देखील अभिनेता विसरला नाही ‘ती’ खास गोष्ट; पहिल्या पत्नीची आठवण शेअर करत म्हणाला…

घटस्फोटानंतर देखील अभिनेता पहिल्या पत्नीच्या अठवणीत? खास व्हिडीओ शेअर करत जुन्या आठवणी केल्या ताज्या, त्यानंतर तिने दिलेलं उत्तर म्हणजे...

घटस्फोटानंतर देखील अभिनेता विसरला नाही 'ती' खास गोष्ट; पहिल्या पत्नीची आठवण शेअर करत म्हणाला...
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 1:10 PM

13 Years Of Ye Maaya Chesave : बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल आहेत, ज्यांनी सुरुवातीला चाहत्यांना कपल गोल्स दिले. पण काही वर्षांनी मात्र त्यांच्या नात्याचा अत्यंत वाईट शेवट झाला. अशाच कपल पैकी एक म्हणजे अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu). नागा चैतन्य – समंथा यांनी जेव्हा घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला. नागा चैतन्य – समंथा यांच्या घटस्फोटाला आता जवळपास एक वर्ष पूर्ण झालं असेल. पण त्यांच्या नात्याची सुरुवात १३ वर्षांपूर्वीच झाली होती. नागा चैतन्य – समंथा यांनी तेलूगू ‘ये माया चेसावे’ (Ye Maaya Chesave) सिनेमाच्या माध्यमातून आपल्या करियरची सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. ‘ये माया चेसावे’ (Ye Maaya Chesave) सिनेमानंतर दोघांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं.

नागा चैतन्य – समंथा यांच्या ‘ये माया चेसावे’ सिनेमा प्रदर्शित होवून १३ वर्ष पूर्ण झाली आहेत. सिनेमाच्या जुन्या आठवणी शेअर करत दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. नागा चैतन्य – समंथा स्टारर ‘ये माया चेसावे’ सिनेमा सिनेमा २०१० मध्ये प्रदर्शित झाला. सिनेमाला आज १३ वर्ष पूर्ण झाली आहेत. हाच निमित्त साधत अभिनेत्याने इन्स्टास्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे.

तर दुसरीकडे समंथा हिने देखील पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. १३ वर्षांची आठवण शेअर करत अभिनेत्री म्हणाली, ‘मी या प्रेमाला अनुभवू शकते. याच प्रेमामुळे मी पुढे वाटचाल करत आहे आणि पुढे कायम करत राहिल… आज मी जे काही आहे, ते याच प्रेमामुळे आहे. १३ वर्ष झाली आहेत, तरी मी आजही नवी सुरुवात करत आहे.’

दरम्यान, नागा चैतन्य सध्या त्याचा आगामी ‘कस्टडी’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. सिनेमा निर्मात्यांनी नुकताच सिनेमाच्या शुटिंगबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा केली. वेंकट प्रभू दिग्दर्शित सिनेमात अभिनेत्र कृती शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेत्रीबद्दल सांगायचं झालं तर, सामंथा रुथ प्रभु (Samantha Ruth Prabhu)सध्या आगामी सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यक्त आहे. सिनेमात अभिनेत्री अभिनेता वरुण धवन याच्यासोबत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर समंथा ‘शाकुंतलम’ सिनेमाच्या प्रदर्शनासाठी देखील सज्ज झाली आहे. शिवाय समंथा हिचा ‘कुशी’ सिनेमा देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.

खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.