Samantha: नागार्जुन घेणार आजारी समंथाची भेट; नाग चैतन्यही जाणार सोबत?

मायोसिटिसग्रस्त समंथाची नाग चैतन्य करणार विचारपूस?

Samantha: नागार्जुन घेणार आजारी समंथाची भेट; नाग चैतन्यही जाणार सोबत?
Samantha, Naga Chaitanya and NagarjunaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 12:52 PM

मुंबई- अभिनेत्री समंथाला मायोसिटिस या आजाराचं निदान झालं. सध्या ती परदेशात त्यावर उपचार घेत आहे. समंथाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली होती. त्यानंतर अनेकांनी तिच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली. समंथाच्या पोस्टवर नाग चैतन्यचा भाऊ अखिल अक्किनेनी यानेसुद्धा कमेंट करत तिला आधार देण्याचा प्रयत्न केला. आता खुद्द नागार्जुन समंथाला भेटण्यासाठी जाणार असल्याचं कळतंय. गेल्या वर्षीच समंथा आणि नागार्जुनचा मुलगा नाग चैतन्य यांचा घटस्फोट झाला.

नाग चैतन्य आणि समंथाने लग्नाच्या चार वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या दोघांच्या घटस्फोटावर नागार्जुन काही मुलाखतींमध्ये व्यक्त झाले होते. आता तिच्या तब्येतीविषयीची माहिती कळताच त्यांनी तिच्याशी भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याचं म्हटलं जात आहे. नागार्जुन यांच्यासोबत नाग चैतन्यसुद्धा समंथाची भेट घेणार की नाही, हे मात्र अद्याप स्पष्ट नाही.

हे सुद्धा वाचा

नागार्जुन यांच्या कुटुंबातून फक्त अखिलनेच सार्वजनिकरित्या समंथाच्या पोस्टवर कमेंट केली होती. ‘प्रिय सॅम, तुला खूप सारं प्रेम आणि परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी शक्ती मिळो’, अशी पोस्ट अखिलने लिहिली होती. अखिल हा नागार्जुन यांचा मुलगा आणि नाग चैतन्यचा सावत्र भाऊ आहे.

समंथाला बॉलिवूडमधूनही बरीच साथ मिळाली आहे. कियारा अडवाणी, कृती सनॉन, जान्हवी कपूर, राशी खन्ना, वरूण धवन यांसारख्या कलाकारांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मायोसिटिस ही आरोग्याची अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये स्नायूंमध्ये जळजळ होते. मायो म्हणजे स्नायू आणि आयटीस म्हणजे जळजळ. याला व्हायरल इन्फेक्शन, विशिष्ट औषधं आणि स्वयं रोगप्रतिकार शक्ती अशी विविध कारणं कारणीभूत असू शकतात, अशी माहिती फोर्टिस रुग्णालयाच्या इंटर्नल मेडिसिन विभागाच्या संचालिका डॉ. सुधा मेनन यांनी दिली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.