Samantha | मुलाशी घटस्फोटानंतर नागार्जुन यांना समंथाची आठवण? ‘या’ व्यक्तीकडे केली चौकशी

'कुशी' या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी अभिनेता विजय देवरकोंडा नुकताच 'बिग बॉस तेलुगू'च्या सातव्या सिझनमध्ये पोहोचला होता. यावेळी सूत्रसंचालक आणि समंथाचे पूर्व सासरे नागार्जुन यांनी तिच्याविषयी विजयला प्रश्न विचारला.

Samantha | मुलाशी घटस्फोटानंतर नागार्जुन यांना समंथाची आठवण? 'या' व्यक्तीकडे केली चौकशी
Nagarjuna, Vijay Deverakonda and SamanthaImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Sep 04, 2023 | 3:11 PM

मुंबई | 4 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा यांचा ‘कुशी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. याच चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त विजय ‘बिग बॉस तेलुगू 7’च्या सेटवर पोहोचला. 3 सप्टेंबरपासून बिग बॉस तेलुगूचा सातवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. यावेळी विजय देवरकोंडा आणि नवीन पोलीशेट्टी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. कार्यक्रमाची सुरुवात विजय देवरकोंडाच्या जबरदस्त परफॉर्मन्सने झाली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते नागार्जुन या शोचं सूत्रसंचालन करतात. नागार्जुन यांचा मुलगा नाग चैतन्यशी समंथाने लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच दोघांनी घटस्फोट घेतला. आता पूर्व सुनेच्या चित्रपटाचं प्रमोशन त्यांच्या शोमध्ये होत असल्याने सर्वांचं लक्ष वेधलं गेलं.

नागार्जुन यांचा समंथाविषयी सवाल

नागार्जुन हे बिग बॉस तेलुगूचं सूत्रसंचालन पाचव्यांदा करत आहेत. या शोच्या पहिल्या सिझनचं सूत्रसंचालन ज्युनियर एनटीआर आणि दुसऱ्या सिझनचं नानीने केलं होतं. स्टार मा या वाहिनीवर आणि डिस्ने प्लस हॉटस्टारवर 3 सप्टेंबर रोजी बिग बॉस तेलुगूचा सातवा सिझन लाँच झाला. यावेळी आपल्या ‘कुशी’ चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी विजय देवरकोंडा शोमध्ये पोहोचला. त्याचा डान्स परफॉर्मन्स संपताच सूत्रसंचालक नागार्जुन मंचावर आले आणि त्याला समंथाविषयी प्रश्न विचारला.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

“तुझी हिरोइन कुठंय?”

‘तुझी हिरोइन कुठंय, समंथा?’ असा प्रश्न नागार्जुन यांनी विजयला केला. त्यावर विजयने सांगितलं की ती सध्या अमेरिकेला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणि मायोसिटीसच्या उपचारासाठी गेली आहे. पुढील दोन दिवसांत ती भारतात परत येणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं. “ती भारतात परत येताच आमच्यासोबत मिळून प्रमोशन करेल अशी अपेक्षा आहे”, असं तो म्हणाला. यावेळी नागार्जुन यांनी विजय आणि समंथाच्या अभिनयाचं कौतुकसुद्धा केलं.

समंथा आणि नाग चैतन्यने 2021 मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतरही समंथावर बरीच टीका झाली होती. लग्नाच्या चार वर्षांनंतर नाग चैतन्य आणि समंथाने घटस्फोट जाहीर केला होता. चाहत्यांसाठी हा खूप मोठा धक्का होता. कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनमध्ये जेव्हा समंथाने हजेरी लावली होती, तेव्हा घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया हा कडवटपणाचा अनुभव देणारा होता, असं ती म्हणाली होती.

मुलाच्या घटस्फोटाविषयी नागार्जुन यांनीसुद्धा एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली होती. “तो आता खूश आहे आणि सध्या तरी मला हेच दिसतंय. माझ्यासाठी तेवढंच पुरेसं आहे. त्याच्या आयुष्यातला तो एक अनुभव होता. दुर्दैवी अनुभव. मात्र आपण सारखा तोच विषय घेऊन बसू शकत नाही. तो काळ गेला. तो काळ आता आमच्या आयुष्यात नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यातूनही तो काळ निघून जावा अशी माझी इच्छा आहे”, असं ते म्हणाले होते.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.