हा अपमान असह्य..; मुलाच्या घटस्फोटाबद्दल बोलणाऱ्या महिला मंत्रीविरोधात नागार्जुन यांची कोर्टात धाव

समंथा आणि नाग चैतन्य यांच्या घटस्फोटाविषयी तेलंगणाच्या मंत्र्या कोंडा सुरेखा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या दोघांच्या घटस्फोटाला बीआरएस अध्यक्ष केटी रामा राव कारणीभूत आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.

हा अपमान असह्य..; मुलाच्या घटस्फोटाबद्दल बोलणाऱ्या महिला मंत्रीविरोधात नागार्जुन यांची कोर्टात धाव
नागार्जुन, नाग चैतन्य, समंथाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 09, 2024 | 1:23 PM

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि तिचा पूर्व पती नाग चैतन्य यांच्या घटस्फोटाबाबत तेलंगणामधील काँग्रेसच्या मंत्री कोंडा सुरेखा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून नाग चैतन्य, समंथा आणि नागार्जुन यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. इतकंच नव्हे तर तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर नागार्जुन यांनी कोंडा सुरेखा यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. या खटल्यावर 8 ऑक्टोबर रोजी सुनावणी पार पडली. यावेळी नागार्जुन हे त्यांची पत्नी अमालासोबत कोर्टात पोहोचले होते. याप्रकरणी त्यांनी कोर्टात आपला जबाब नोंदविला आहे.

काय म्हणाले नागार्जुन?

“कोंडा सुरेखा यांनी माझ्या आणि माझ्या कुटुंबाबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. सोशल मीडियावर त्यांचं हे मानहानीकारक वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचं पाहून मला खूप मोठा धक्का बसला. त्यांनी केलेल्या खोट्या वक्तव्यामुळे मला भावनिक ताण आणि अपमान सहन करावा लागला. अशा खोट्या आरोपांमुळे माझी वैयक्तिक आणि व्यावसायिक बदनामी झाली. माझ्या संपूर्ण कुटुंबाला हानी पोहोचली. म्हणून मी विनंती करतो की न्यायालयाने या गुन्ह्याची दखल घेऊन आरोपीला गुन्हेगारी बदनामीचा गुन्हा केल्याबद्दल त्या कायद्यानुसार शिक्षा द्यावी”, असं नागार्जुन कोर्टात म्हणाले.

काय म्हणाल्या होत्या कोंडा सुरेखा?

“केटीआर यांच्यामुळेच 100 टक्के नाग चैतन्यचा घटस्फोट झाला आहे. कारण एन. कन्वेन्शन हॉलवर हातोडा पडू नये म्हणून तुम्हाला समंथाला माझ्याकडे पाठवावं लागलं होतं. नागार्जुन यांनी समंथाला केटीआर यांच्याकडे जाण्यास भाग पाडलं होतं आणि ते म्हणाले, एकतर तू (समंथा) आमचं म्हणणं ऐक किंवा घटस्फोट दे. त्यामुळेच हा घटस्फोट झाला. संपूर्ण इंडस्ट्रीला याबद्दल माहीत आहे”, असं कोंडा सुरेखा यांनी म्हटलं होतं.

हे सुद्धा वाचा

सुरेखा यांच्या या वक्तव्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात होताच त्यांनी समंथाची जाहीर माफी मागितली होती. ‘महिलांना तुच्छ लेखणाऱ्या एका नेत्याबाबत मी ते वक्तव्य केलं होतं. त्यात तुझ्या भावना दुखावण्याचा माझा कोणताच हेतू नव्हता. तू तुझ्या आयुष्यात ज्या पद्धतीने यश संपादित केलंस, ते माझ्यासाठी केवळ कौतुकास्पदच नाही तर आदर्शही आहे. माझ्या वक्तव्यामुळे तुझ्या आणि तुझ्या चाहत्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माझं वक्तव्य बिनशर्त मागे घेते’, अशी पोस्ट त्यांनी लिहिली होती.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.