नक्की नवरा कोण आहे? मंदिरात नागार्जुनने सुनेसोबत असं काय केलं? नेटकऱ्यांकडून झाला ट्रोल

नागा चैतन्य आणि शोभिता लग्नानंतर लगेच दुसऱ्या दिवशी एका मंदिरात दर्शनासाठी गेले असताना त्यांच्यासोबत नागार्जुनही उपस्थित होते. तेव्हा मंदिरात पुजा करत असताना नागार्जुन यांची शोभितासोबतची एक कृती नेटकऱ्यांना चांगलीच खटकली असून त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे. 

नक्की नवरा कोण आहे? मंदिरात नागार्जुनने सुनेसोबत असं काय केलं? नेटकऱ्यांकडून झाला ट्रोल
Follow us
| Updated on: Dec 09, 2024 | 6:29 PM

नुकताच नागा चैतन्य आणि शोभिता यांचे लग्न अगदी थाटामाटात पार पडले. त्यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली. यांच्या लग्नानंतर नागार्जुन यांनी लेकासाठी आनंदही व्यक्त केला होता. तसेच सूनेसाठी एक भावनिक पोस्टही लिहिली होती. पण आता लग्नानंतर नागा चैतन्य आणि सून शोभितासोबत नागार्जुन एका मंदिरात दर्शनासाठी गेले असताना त्यांनी जे केलं त्यावरून त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.

नागार्जुन यांच्या एका कृतीने सर्वांचेच लक्ष वेधले 

गेल्या काही दिवसांपासून नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नापूर्वीचे विधी आणि लग्नाचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पारंपारिक पद्धतीने नागा आणि शोभिताचा विवाह सोहळा झाला. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला 4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये विवाहबद्ध झाले.

त्यानंतर नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला हे श्रीशैलम, आंध्र प्रदेशमधील मल्लिकार्जुन मंदिरात त्यांच्या लग्नाच्या एका दिवसानंतर आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. नागार्जुनही या जोडप्यासोबत होते. मंदिरातील त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. व्हिडीओंमध्ये या जोडप्यासोबत नागार्जुनही पूजा करताना दिसत आहेत. या व्हिडीओतील एका क्षणाने मात्र लोकांचे लक्ष वेधून घेतलं.

सुनेच्या खांद्यावरील केस बाजूला सारल्याने ट्रोल 

व्हायरल व्हिडीओमध्ये नागार्जुन, नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला पुजाऱ्यासमोर डोके टेकवताना दिसत आहे. पुजारी त्यांना हळद, चंदन आणि फुलांनी बनवलेले ताट देतात, जेणेकरून ते स्वत:ला टिळा लावतील. पहिल्यांदा पुजारी नागार्जुनच्या कपाळावर चंदन लावतात.

त्यानंतर शोभिताला ते चंदन लावण्यास सांगतात. त्यावेळी शोभिता चंदन लावत असताना तिचे मोकळे केस खांद्यावरुन पुढे येतात. तेव्हा नागार्जुन शोभिता चंदन लावेपर्यंत केस मागे धरुन ठेवतो. हे पाहून नेटकऱ्यांनी नागार्जुन यांना ट्रोल केलंय. मात्र काहींनी त्यांचं कौतुकही केलं आहे.

“नक्की नवरा कोण”, नेटकऱ्यांकडून प्रचंड ट्रोल

व्हायरल व्हिडीओवर एका चाहत्याने लिहिलंय की, “सासरा सुनेच्या केसांना असा कसा हात लावू शकतो?”, तर एकानं लिहिलं आहे “नक्की नवरा कोण आहे?”,तर एकाने लिहिले आहे की “नागार्जुन सरांनी केलेली कृती चुकीची ठरत आहे” अशा अनेक कमेंट येत असून नेटकऱ्यांनी नागार्जुन यांचे हे वागणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. तर. काहींनी मात्र त्यांचे कौतुक केले आहे, एका युजर्सने कौतुक करत म्हटलं आहे,”ते तिच्या वडिलांसारखा आहे आणि ते तिची काळजी घेत आहेत.’ आणखी एका युजरने लिहिलंय, ‘मला नागार्जुन खूप आवडतात.’ तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘ही कृती सुनेचा आदर आणि काळजी देखील दर्शवते.’

दरम्यान हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.