मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन एक प्रसिद्ध अभिनेता आहे. नागार्जुन याने आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अभिनेता कायम त्याच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. फार कमी लोकांना माहिती आहे की, अभिनेत्याची पत्नी देखील झगमगत्या विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्याच्या पत्नीचा सिनेविश्वात दबदबा होता. पण अभिनेत्रीने लग्नानंतर झगमगत्या विश्वाचा निरोप घेतला. नागार्जुन यांच्या पत्नीचं नाव अमाला अक्किनेनी (Amala Akkineni) आहे. अमाला अक्किनेनी यांनी फक्त साऊथ सिनेविश्वातच नाही तर, बॉलिवूडमध्ये देखील अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
१९८६ ते १९९२ या काळात सर्वत्र फक्त आणि फक्त अमाला अक्किनेनी यांची चर्चा होती. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनात घर केलं. अमाला अक्किनेनी यांनी अनेक हिट सिनेमांमध्ये काम केलं. ‘शिवा’, ‘कारवा’ अशा अनेक एकापेक्षा एक सिनेमांमध्ये त्यांनी अमाला अक्किनेनी यांनी अभिनय केला.
अमाला अक्किनेनी या फक्त अभिनेत्री नसून भरतनाट्यम डान्सर देखील आहेत. अमाला अक्किनेनी यांचा जन्म कोलकाता याठिकाणी झाला. अमाला अक्किनेनी यांनी १९९२ साली नागार्जुन यांच्यासोबत लग्न केलं. अमाला अक्किनेनी आणि नागार्जुन यांना एक मुलगा आहे. नागार्जुन यांचं अमाला अक्किनेनी यांच्यासोबत दुसरं लग्न आहे.
नागार्जुन यांच्या पहिल्या पत्नीचं नाव लक्ष्मी दग्गुबाती असं आहे. नागार्जुन आणि लक्ष्मी दग्गुबाती यांना एक मुलगा देखील आहे. त्यांच्या मुलाचं नाव नागा चैतन्य असं आहे. अमाला अक्किनेनी या नागा चैतन्य याच्या सावत्र आई आहेत. Mythili Ennai Kaathli या पहिल्या सिनेमामध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अमाला अक्किनेनी एका रात्रीत स्टार झाल्या.
यशाच्या उच्च शिखरावर असताना अमाला अक्किनेनी यांनी नागार्जुन यांच्यासोबत लग्न केलं आणि झगमगत्या विश्वाचा निरोप घेतला. त्यानंतर तब्बल २० वर्षांनंतर अमाला अक्किनेनी यांनी पुन्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. २०१२ साली अमाला अक्किनेनी यांनी ‘लाईफ इज ब्यूटीफूल’ सिनेमातून पदार्पण केलं. अमाला अक्किनेनी यांनी अनेक पुरस्कारांवर स्वतःचं नाव कोरलं आणि टीव्हीमध्ये देखील काम केलं.
अभिनेता नागार्जुनची पत्नी अमला अक्किनेनी हिला हैदराबादमध्ये अटक करण्यात आली होती. वनक्षेत्रात कोळसा खाणकामाला विरोध केल्याबद्दल या अभिनेत्रीसह नऊ जणांना अटक करण्यात आली होती. ज्यामुळे अमाला अक्किनेनी वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या.