‘कोणतीच परीक्षा अंतिम नसते..’, नापास होणाऱ्या मुलांना नागराज मंजुळे यांचा मोठा सल्ला

Nagraj Manjule | परीक्षात अपयश आल्यानंतर अनेक विद्यार्थी स्वतःचं आयुष्य संपवतात, त्यांच्यासाठी प्रेरणा ठरले नागराज मंजुळे... नागराज मंजुळे यांनी का केली होती स्वतःची मार्कशीट पोस्ट... त्यांचे मार्क्स पाहून तुम्हालाही बसेल धक्का...

'कोणतीच परीक्षा अंतिम नसते..', नापास होणाऱ्या मुलांना नागराज मंजुळे यांचा मोठा सल्ला
Follow us
| Updated on: Nov 04, 2023 | 10:42 AM

मुंबई | 4 नोव्हेंबर 2023 : दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘झुंड’, ‘नाळ’ सिनेमांनी प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. आता लवकरच ‘नाळ’ सिनेमाचा दुसरा भाग चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. नागराज मंजुळे मराठी सिनेविश्वातील एक मोठं नाव आहे. नागराज मंजुळे यांनी त्यांच्या करियरची सुरुवात शुन्यापासून केली आणि आज ते यशाच्या उच्च शिखरावर पोहोचले आहे. पण यशाच्या मार्गावर काटे असतात… हे तितकंच सत्य आहे. पण नागराज मंजुळे कधीही खचले नाही. त्यांनी त्यांचा प्रवास सुरुच ठेवला. दरम्यान, नागराज मंजुळे यांनी स्वतःची मार्कशीट सोशल मीडियावर शेअर केली होती.

जवळपास पाच – सहा वर्षांपूर्वी नागराज मंजुळे यांनी स्वतःचे दहावीची मार्कशीट शेअर केली होती. याचं कारण त्यांनी ‘टीव्ही 9’ ला दिलेल्या एक मुलाखतीत सांगितलं आहे. नागराज मंजुळे म्हणाले, ‘कोणतीच परीक्षा अंतिम नसते… आयुष्यात सतत प्रयत्न करायला हवेत…’ असं देखील नागराज मंजुळे म्हणाले..

‘नापास झाल्यामुळे कोणत्यातरी मुलाने आत्महत्या केली होती. मला कळलं होतं. जर मी नापास होवून जयागचंच नाही असं ठरवलं असतं तर, आता जे घडतंय त्यावेळी मला माहिती नव्हतं आणि कोणतीच परीक्षा अंतिम नसते. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही हारलात तरी काहीही हरकत नाही… परीक्षा म्हणजे तुमचं आयुष्य नाही.’

पुढे नागराज मंजुळे म्हणाले, ‘आयुष्या छोट्या – मोठ्या परीक्षांमध्ये अपयश आलं तरी काही होत नाही. आयुष्य जगता आलं पाहिजे.’ एवढंच नाही तर, ‘माझ्यासारखा वेडा माणूस काहीतरी करु शततो, तर तुम्ही देखील करु शकता…’ असं म्हणत नागराज मंजुळे यांनी तरुणांना आणि विद्यार्थ्यांना खचून न जाता आयुष्यात पुढे जाण्याचा सल्ला दिला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नागराज मंजुळे यांची चर्चा रंगली आहे.

‘नाळ 2’ सिनेमा

लवकरच ‘नाळ’ सिनेमाचा दुसरा भाग चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सर्वत्र ‘नाळ २’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. 10 नोव्हेंबर रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. चाहते देखील 10 नोव्हेंबरच्या प्रतीक्षेत आहेत.

' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.