महात्मा फुले वाचले नसते तर मी आज… नागराज मंजुळे यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने सन्मान

Nagraj Manjule: नागराज मंजुळे यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने सन्मान... नागराज मंजुळे यांचं नाव मराठी व हिंदी सिनेसृष्टीत अग्रक्रमाने घेतलं जातं....

महात्मा फुले वाचले नसते तर मी आज... नागराज मंजुळे यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने सन्मान
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 2:44 PM

महात्मा फुले पुण्यतिथीचे औचित्य साधून गुरुवारी फुले वाडा येथील समता भूमी येथे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. कार्यक्रमात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते मंजुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर नागराज मंजुळे यांनी भावना व्यक्त केल्या आणि छगन भुजबळ यांचे आभार देखील मानले.

नागराज मंजुळे म्हणाले, ‘मला खूप आनंद वाटतोय. समता परिषद आणि छगन भुजबळ यांचे आभार मानतो. फुलेंची आणि माझी ओळख ज्या टप्यावर झाली…. ती झाली नसती तर आता मी वेगळ्या ठिकाणी असतो. माझे वडील दगड फोडण्याचं काम करायचे. मी बाबासाहेबांचा फोटो घरात लावला त्यावेळी वडील भांडायचे…. वडील म्हणायचे महाराचा फोटो का घरात कशाला लावला?’

पुढे मंजुळे म्हणाले, ‘मी ज्या जातीत जन्मलो पण, फुले, आंबेडकर, शिवाजी महाराज हे माझे कोणतरी वंशज आहेत असं मानायला पाहिजे. गेल्या 100 जे काही बदल झाले आहेत, ते फक्त आणि फक्त या लोकांमुळे झाले आहेत. संविधान वाचलंच पाहिजे पण त्या बरोबर फुलेंचे साहित्य देखील वाचले पाहिजे. अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून संघर्ष करावा लागला… पण बाबासाहेबांनी तोच अधिकार काहीही न करता दिला…’ असं देखील नागराज मंजुळे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

सांगायचं झालं तर, नागराज मंजुळे यांचं नाव मराठी व हिंदी सिनेसृष्टीत अग्रक्रमाने घेतलं जातं. नागराज मंजुळे यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, फॅन्ड्री, सैराट, झुंड या सारखे सिनेमे नागराज यांनी मराठी सिनेविश्वाला दिले आहेत. एवढंच नाही तर, ‘नाळ’ आणि ‘नाळ 2’ या सिनेमांनी देखील चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं.

नागराज मंजुळे मराठी सिनेविश्वातील एक मोठं नाव आहे. नागराज मंजुळे यांनी त्यांच्या करियरची सुरुवात शुन्यापासून केली आणि आज ते यशाच्या उच्च शिखरावर पोहोचले आहे.

पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.