Nagraj Manjule: “प्रेम करणं हाच विद्रोह”; पहा नागराज मंजुळेंचं गाजत असलेलं ‘विद्रोही’ भाषण

उदगीरमध्ये पार पडलेल्या 16व्या विद्रोही संमेलनाच्या (Vidrohi Marathi Sahitya Sammelan) समारोपाला त्यांनी हजेरी लावली होती. सर्वसामान्य लोक आणि साहित्य यांच्यातील दरी कमी व्हावी असंही त्यांनी यावेळी म्हटलं. (Latur)

Nagraj Manjule: प्रेम करणं हाच विद्रोह; पहा नागराज मंजुळेंचं गाजत असलेलं 'विद्रोही' भाषण
Nagraj ManjuleImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 10:26 AM

“आजच्या काळात विद्रोह म्हणजे विद्रोह नाही, तर प्रेम करणं हाच विद्रोह आहे. भांडणं सोपं झालंय आणि भांडण सुरू झाल्यावर शांत बसणं म्हणजे विद्रोह. त्याला खरी ताकद लागते, नाहीतर अरे ला कारे म्हणायला काहीच ताकद लागत नाही,” असं म्हणत दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी सर्वसामान्यांच्या जगण्यात उपयोगी पडणारं साहित्य आणि कला पुढे आणण्याचं आवाहन केलं आहे. उदगीरमध्ये पार पडलेल्या 16व्या विद्रोही संमेलनाच्या (Vidrohi Marathi Sahitya Sammelan) समारोपाला त्यांनी हजेरी लावली होती. सर्वसामान्य लोक आणि साहित्य यांच्यातील दरी कमी व्हावी असंही त्यांनी यावेळी म्हटलं. (Latur)

काय म्हणाले नागराज मंजुळे?

“समाजात कवी आहेत, कलाकार आहेत, साहित्यिक आहेत तरी लोक झोपलेले असतील, तर ही मोठी गडबड आहे. काहीतरी बिनसलेलं आहे. साहित्यिक हा समाजाला जागं करण्याचं काम करतो आणि ते घडलं पाहिजे. समाजातील धोके कोणते हे साहित्यिक सांगतात, त्याविरोधात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करतात. विद्रोही संमेलन हे विचारांचं संमेलन आहे. सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत साहित्य पोहोचावं, हे अंतर कमी व्हावं”, असं नागराज मंजुळे म्हणाले.

नागराज मंजुळे यांनी यावेळी काही कविता सादर करत विविध सामाजिक प्रश्नांवर, स्त्री-पुरुष समानतेवर भाष्य केलं. “विद्रोही संमेलनात दगड, खडी फोडणाऱ्या समाजाचे लोक आले, हेच या संमेलनाचं यश आहे. आजकाल माथी भडकावणं खूप सोपं आहे. त्यांना दिशा देणारे लोक घडविण्याची जबाबदारी आपली आहे,” असं ते पुढे म्हणाले.

पहा संपूर्ण भाषण-

हेही वाचा:

Pratik Gandhi: ‘कॉलर पकडून मुंबई पोलिसांनी गोदामात ढकललं’; ‘स्कॅम 1992’ फेम प्रतीक गांधीसोबत घडला प्रकार

Mannat: शाहरुख खानचा ‘मन्नत’ बंगला ट्विटरवर का होतोय ट्रेंड? ‘हे’ आहे खास कारण

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.