Nana Patekar | विवाहित नाना पाटेकर यांच्या प्रेमात होती मनिषा कोईराला; अत्यंत वाईट झाला नात्याचा अंत
Nana Patekar | मनिषा कोईराला संपत्ती, प्रसिद्धी असुनही जगते एकटी... एकेकाळी होती नाना पाटेकर यांच्या प्रेमात... का झाला नात्याचा अंत? अनेक वर्षांनंतर नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना पुन्हा उधाण.... तुम्हालाही माहिती नसेल सत्य
मुंबई : 16 सप्टेंबर 2023 | अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) सध्या आगामी ‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमामुळे चर्चेत आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा नाना पाटेकर त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होते. बॉलिवूडमध्ये नाना पाटेकर यांचं स्थान भक्कम होतं. नाना पाटेकर यांच्यासोबत स्क्रिन शेअर करण्यासाठी अनेक अभिनेत्री रांगेत होत्या. अशात अभिनेत्री मनिषा कोईराला आणि नाना पाटेकर यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला होता. फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, चाहत्यांमध्ये देखील नाना पाटेकर आणि मनिषा यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला होता. दोघे एकमेकांवर प्रचंड प्रेम करत होते. पण दोघांची लव्हस्टोरी लग्नापर्यंत पोहोचू शकली नाही. अशात दोघांच्या नात्याचा अंत अत्यंत वाईट झाला.
नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांच्या नात्याची सुरुवात १९९६ साली प्रदर्शित ‘अग्निसाक्षी’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान झाली. शुटिंग दरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. तेव्हा मनिषा हिचं ब्रेकअप विवेक मुशरान याच्यासोबत झालं होतं. ज्यामुळे अभिनेत्री प्रचंड दुःखी होती. अशात अभिनेत्रीला नाना पाटेकर यांची साथ मिळाली.
सिनेमाच्या शुटिंग दरम्यान अधिक वेळ सोबत व्यतीत केल्यानंतर दोघांमध्ये प्रेम अधिक बहरलं. दोघांनी गुपचूप एकमेकांना डेट करण्यास देखील सुरुवात केली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा नाना मनिषा हिला डेट करत होते, तेव्हा नाना पाटेकर फक्त विवाहितच नव्हते, तर त्यांना दोन मुलं देखील होती. विवाहित असताना देखील नाना पाटेकर यांनी मनिषा हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते..
अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर एक दिवस असा आला जेव्हा नाना पाटेकर आणि मनिषा यांच्या नात्याचा अंत झाला. मनिषा हिने नाना पाटेकर यांना अभिनेत्री आयेशा जुल्का हिच्यासोबत पाहिलं. तेव्हा संतापलेल्या मनिषा हिने नाना पाटेकर यांच्यासोबत असलेले सर्व सबंध तोडले.. मनिषा हिचं नाव नाना पाटेकर यांच्यासोबतच अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं.
अखेर, मनीषा हिने नेपाळी व्यावसायिक सम्राट दहलशी लग्न केले, पण २०१२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मनिषा हिच्याकडे आज सर्वकाही आहे. पण अभिनेत्री आजही एकटं आयुष्य जगते. मनिषा आता बॉलिवूडपासून देखील दूर आहे. पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर मनिषा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.