नाना पाटेकर यांचं धक्कादायक वक्तव्य, ‘… नाहीतर आज अंडरवर्ल्डमध्ये गुंड असतो’
Nana Patrkar: रागीट स्वभावामुळे कायम चर्चेत राहणाऱ्या नाना पाटेकर यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, '... नाहीतर आज अंडरवर्ल्डमध्ये गुंड असतो', नाना पाटेकर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात चर्चेत...
Nana Patrkar: दिग्गज अभिनेते नाना पाटेकर कायम त्यांच्या रागीट स्वभावामुळे चर्चेत असतात. स्वतःच्या स्वभावामुळे नाना पाटेकर यांना अनेकदा वादग्रस्त परिस्थितीचा देखील सामना करावा लागला आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी दिग्दर्शक संजय लिला भंसाळी यांच्यासोबत झालेल्या भांडणावर मौन सोडलं आहे. शिवाय रागीट असल्याचं कबूल करत मी अभिनेता नसतो तर, आज मी अंडरवर्ल्डमध्ये गुंड असतो… असं देखील नाना पाटेकर म्हणाले.
नुकताच झालेल्या मुलाखतीत नाना पाटेकर म्हणाले, ‘मी मानतो की लोकं मला घाबरतात कारण मी प्रचंड रागीट आहे. मी रागीट आहे, पण मी फक्त कामासाठी बोलतो. आज देखील कोणी मला प्रवृत्त केल्यास मला त्या व्यक्तीला मारहाण करतो…’ असं देखील नाना पाटेकर म्हणाले.
‘मी अभिनेता नसतो, तर आज मी अंडरवर्ल्डमध्ये असतो. मी मस्करी करत नाही. याबाबतीत मी गंभीर आहे. अभिनयाने मला एक आऊटलेट दिला. माझ्या निराशा दूर करण्याचा हा एक मार्ग बनला आहे. अनेकांसोबत माझे वाद झाले आहे. मी अनेकांना मारलं देखील आहे. पण आता मला त्यांची नावे देखील आठवत नाही…’ असं देखील नाना पाटेकर म्हणाले.
View this post on Instagram
नाना पाटेकर आणि संजय लिला भन्सळी यांच्यातील वाद
मुलाखतीत नाना पाटेकर यांनी संजय लिला भन्सळी यांच्यासोबत असलेल्या वादांवर देखील मौन सोडलं. ‘मी संजय लीला भन्साळींसोबत काम परत करण्याची शक्यता आहे, पण मी ज्याप्रकारे त्यांच्यावर ओरडलो त्यामुळे त्यांना वाईट वाटलं असावं. त्यानंतर आम्ही एकत्र काम केलं नाही. पण त्याचा मझ्या आयुष्यावर काही फरक देखील पडला नाही…’ असं देखील नाना पाटेकर म्हणाले.
सांगायचं झालं तर, नाना पाटेकर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. चाहते आज देखील नाना पाटेकर यांच्या आगामी सिनेमाच्या प्रतिक्षेत असतात. नाना पाटेकर यांच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, जगभरात फार मोठी आहे.