ब्रेकअप आयुष्यातील फार कठीण टप्पा…, नाना पाटेकर – मनिषा कोईराला यांच्या नात्याचं सत्य

Nana Patekar on Manisha Koirala: रिलेशनशिपमध्ये होते नाना पाटेकर - मनिषा कोईराला, का तुटलं नातं? अभिनेत्रीबद्दल नाना म्हणाले होते, 'ब्रेकअप आयुष्यातील फार कठीण टप्पा... आता तिला पाहिल्यानंतर वाटतं...', नाना पाटेकर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात चर्चेत...

ब्रेकअप आयुष्यातील फार कठीण टप्पा..., नाना पाटेकर – मनिषा कोईराला यांच्या नात्याचं सत्य
Follow us
| Updated on: Dec 15, 2024 | 11:18 AM

Nana Patekar on Manisha Koirala: एक काळ असा होता जेव्हा झगमगत्या विश्वात सर्वत्र फक्त अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री मनिषा कोईराला यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला होता. दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं होतं. दोघांनी 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अग्निसाक्षी’ सिनेमात एकत्र काम केलं. त्यानंतर ‘खामोशी’ सिनेमात दोघे एकत्र दिसले. मिळालेल्या माहितीनुसार सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांना विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक वर्षांनंतर नाना पाटेकर यांनी मनिषा हिच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. शिवाय ‘हीरामंडी’ सीरिजमधील अभिनेत्री साकारलेल्या भूमिकेचं देखील नाना पाटेकर यांनी कौतुक केलं.

मुलाखतीत नाना पाटेकर यांनी अनेक सेलिब्रिटींच्या कामाचं कौतुक केलं आणि जेव्हा मनिषा कोईराला हिचं नाव आलं तेव्हा ‘महान अदाकारा…’ असं नाना पाटेकर म्हणाले. ‘नुकताच हीरामंडी सीरिज पाहिलं. मनिषाने चांगलं काम केलं आहे.’ पुढे नाना यांना ‘फोन करून मनिषाच्या कामाचं कौतुक केलं का?’ असा प्रश्न विचारण्यात आला.

यावर नाना म्हणाले, ‘आता फोन नंबर तेच राहिलेले नाहीत कदाचित…’ असं नाना म्हणाले. नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, रिपोर्टनुसार नाना पाटेकर मनिषा हिच्यासाठी प्रचंड पझेसिव्ह होते. मनिषा कोईराला हिने नाना पाटेकर यांना अभिनेत्री आयेशा जुल्का हिच्यासोबत बंद खोलीत पाहिलं होतं. त्यानंतर अभिनेत्रीने नाना पाटेकर यांच्यासोबत असलेलं नातं संपवलं. मनिषा हिच्यासोबच ब्रेकअप झाल्यानंतर नाना पाटेकर यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. जे आजही चर्चेत आहे.

ब्रेकअपवर नाना पाटेकर यांचं मोठं वक्तव्य…

नाना पाटेकर म्हणाले होते, ‘ब्रेकअप आयुष्यातील फार कठीण टप्पा आहे. ब्रेकअपचा सामना करणं फार कठीण आहे. ज्याने ब्रेकअपचं दुःख सोसलं आहे. त्यालाच या भावना कळतील…’ असं देखील नाना पाटेकर म्हणाले होते.

मनिषा हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री नाना पाटेकर यांच्यासोबत अन्य जवळपास 12 सेलिब्रिटींना डेट केलं. पण कोणासोबतच अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर अभिनेत्रीने उद्योजक सम्राट दलाल याच्यासोबत देखील लग्न केलं. पण दोन वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अभिनेत्रीने पुन्हा लग्न करण्याचा विचार केला नाही. आज वयाच्या 53 व्या वर्षी देखील अभिनेत्री एकटीच आयुष्य जगते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.