Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar यांना आजही सतावतेय एक्स – गर्लफ्रेंडची आठवण ; भावुक होत म्हणाले…

'आज जेव्हा मी तिला पाहतो...', एक्स - गर्लफ्रेंडच्या आठवणीत नाना पाटेकर भावुक... आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो ती व्यक्ती आयुष्याच्या एका वळणावर अनोळखी होते..

Nana Patekar यांना आजही सतावतेय एक्स - गर्लफ्रेंडची आठवण ; भावुक होत म्हणाले...
Nana Patekar यांना आजही सतावतेय एक्स - गर्लफ्रेंडची आठवण ; भावुक होत म्हणाले...
Follow us
| Updated on: Feb 08, 2023 | 2:41 PM

Nana Patekar : प्रेम ही अशी भावना आहे… जी सहज विसरता येत नाही. आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो ती व्यक्ती आयुष्याच्या एका वळणावर अनोळखी होते.. हे दुःख आयुष्यभरासाठी मनाच्या एका कोपऱ्यात दडून राहतं. असा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. काही असे सेलिब्रिटी त्यांच्या खासगी आयुष्यातील अनुभव चाहत्यांसोबत शेअर करतात. कधी – कधी खास व्यक्तीबद्दल सांगताना सेलिब्रिटींच्या डोळ्यात पाणी देखील येतं. असचं काही अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत देखील झालं आहे. एक काळ असा होता जेव्हा नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा तुफान रंगल्या. मनिषा कोईराला आणि नाना पाटेकर यांनी पहिली भेट ‘अग्निसाक्षी’ सिनेमाच्या सेटवर झाली असं सांगण्यात येतं.

‘अग्निसाक्षी’ सिनेमा १९९६ मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हा मनिषा फक्त २७ वर्षांची होती. तर नाना पाटेकर जवळपास ४५ वर्षांचे होते. दोघांच्या वयात फार अंतर होतं. नाना पाटेकर आणि मनिषा यांच्यात वयाचं अंतर तर होतच पण नाना विवाहित होते आणि त्यांना दोन मुलं देखील होती. म्हणून मनिषा आणि नाना पाटेकर कधीही एकत्र येवू शकले नाहीत. कारण नाना पाटेकर यांना पत्नीला घटस्फोट द्यायचा नव्हता.

रिपोर्टनुसार, मनीषा कोइराला (Manisha Koirala Movies) हिच्यासोबत नातं तुटल्यानंतर नाना पाटेकर कधीही अभिनेत्रीवर असलेलं प्रेम विसरु शकले नाही. एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी सांगितलं होतं की, आज देखील नाना यांच्या अठवणीत मनिषा आहे. मी आज देखील जेव्हा तिला पाहतो, ती काय करते.. तेव्हा मी स्वतःच्या भावना मनात दाबून ठेवतो.. ब्रेकअपनंतरचा काही कालावधी फार कठीण होत… असं देखील नाना पाटेकर म्हणाले.

अभिनेत्री मनिषा कोइराला हिचं नाव देखील अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण अभिनेत्री सर्वकाही असून आजही एकटी आयुष्य जगते. अभिनेत सेलिब्रिटींसोबत नाव जोडल्यानंतर मनिषा कोईराला हिने 19 जून 2010 उद्योगपती सम्राट दहल यांच्यासोबत लग्न केलं. पण त्यांचं लग्न अधिक काळ टिकू शकलेलं नाही. (manisha koirala boyfriend)

लग्नाच्या काही महिन्यानंतर मनिषाचे पती सम्राट दहल यांच्यासोबत वाद होवू लागले. मनिषा आणि सम्राट दहल यांचं लग्न फक्त दोन वर्ष टिकलं. त्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. खासगी आयु्ष्यात आलेल्या चढ – उतारामुळे माझ्या नशिबात प्रेम नाहीच असं अभिनेत्री एका मुलाखीतत म्हटली होती. मला पुन्हा निराश करण्याची परवानगी मी कोणाला देणार नही. चुकीच्या नात्यात अडकण्यापेक्षा एकटं राहणं केव्हाही योग्य असं देखील मनिषा म्हणाली.

पुढे मनिषा म्हणाली, ‘मी आता आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे, ज्याठिकाणी मी चुकीचं पाऊल टाकू शकत नाही. परमेश्वराने मला नवी संधी दिली आहे. एक वेळ अशी होती, जेव्हा माझं आयुष्य पूर्ण वेगळं झालं होतं. पण प्रत्येक नव्या संघर्षाने मला एक नवी संधी दिली आहे. तुम्ही जेव्हा मोठ्या अडचणीत असता, तेव्हा, तुम्हाला खऱ्या आयुष्याचा अर्थ कळतो.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?.
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?.
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?.