Nana Patekar | जेव्हा २१ वर्ष लहान अभिनेत्रीवर जडला नाना पाटेकर यांचा जीव; तिच्यावर लादली अनेक अनेक बंधनं?

बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत नाना पाटेकर यांचे होते 'प्रेमसंबंध', तिला अभिनेत्यासोबत लग्न करायचं होतं, पण...; गुपचूप भेटी वाढत असताना नाना पाटेकर यांनी तिच्यावर लादली अनेक अनेक बंधनं

Nana Patekar | जेव्हा २१ वर्ष लहान अभिनेत्रीवर जडला नाना पाटेकर यांचा जीव; तिच्यावर लादली अनेक अनेक बंधनं?
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 10:19 AM

मुंबई | 16 ऑगस्ट 2023 : अभिनेते नाना पाटेकर यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही चाहते नाना पाटेकर यांचे सिनेमे तेवढ्याच आवडीने पाहतात. नाना पाटेकर यांचं अभिनय, डायलॉग… इत्यादी गोष्टींमुळे नाना पाटेकर कायम चर्चेत असतात. पण एक काळ असा होता, जेव्हा नाना पाटेकर त्यांच्या सिनेमांमुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आले. बॉलिवूडमध्ये स्वतःओळख आणखी भक्कम करत असताना नाना पाटेकर यांचं नाव अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. विवाहित असताना देखील स्वतः पेक्षा २१ वर्ष लहान अभिनेत्रीवर नाना पाटेकर यांचा जीव जडला. अभिनेत्रीला नाना पाटेकर यांनी अनेक वर्ष डेट देखील केलं.

अनेक वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांच्या नात्याचा अंत अत्यंत वाईट झाला. ज्या अभिनेत्रीवर नाना पाटेकर यांचा जीव जडला होता, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मनीषा कोईराला होती. मनीषा कोईराला हिच्यावर नाना पाटेकर प्रचंड प्रेम करत होते. ‘खामोशी: द म्यूजिकल’ सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांच्यात प्रेम बहरलं.

मनीषा कोईराला आणि नाना पाटेकर एकमेकांना लपून भेटायचे… अशा देखील अनेक चर्चा रंगल्या. बॉलिवूडमध्ये सर्वत्र फक्त आणि फक्त मनीषा कोईराला आणि नाना पाटेकर यांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा रंगली होती. मनीषा हिच्यासाठी नाना पाटेकर प्रचंड पजेसिव्ह होते. एकमेकांच्या प्रेमात असल्यामुळे मनीषा देखील नाना यांचं सर्वकाही ऐकायची.. असं देखील अनेकदा समोर आलं.

मनीषा देखील नाना पाटेकर यांच्यावर प्रचंड प्रेम करायची. मनीषा हिला नाना यांच्यासोबत लग्न देखील करायचं होतं. पण नाना पाटेकर विवाहित असून एका मुलाचे वडील देखील होते. म्हणून दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. दरम्यान, नाना पाटेकर यांच्या नावाची चर्चा अभिनेत्री आयेशा जुल्का हिच्यासोबत देखील रंगू लागल्या. आयेशा आणि नाना यांना एकत्र पाहिल्यानंतर मनीषा हिला मोठा धक्का बसला.

अशात नाना पाटेकर यांच्यापासून दूर होण्याचा निर्णय अभिनेत्रीने घेतला आणि उद्योजक सम्राट दहल याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं अधिक काळ टिकलं नाही. लग्नाच्या दोन वर्षानंतर मनीषा कोईराला हिचा पतीसोबत घटस्फोट झाला.

खासगी आयुष्यात अनेक चढ-उतार आल्यानंतर मनिषाने ‘माझ्या नशिबातच पुरुषाचं प्रेमच नाही आणि हे सत्य मी आता स्वीकारलं आहे.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. ‘मला पुन्हा निराश करण्याची परवानगी मी कोणाला देणार नही. चुकीच्या नात्यात अडकण्यापेक्षा एकटं राहणं केव्हाही योग्य असं देखील मनीषा म्हणाली होती.

...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.