Nana Patekar : ‘या’ अभिनेत्रीमुळे घटस्फोट न घेता पत्नीपासून वेगळे राहतात नाना पाटेकर?

Nana Patekar : नाना पाटेकर आणि पत्नी नीलकांती अनेक वर्षांपासून घटस्फोट न घेता राहात आहेत विभत्क, 'ही' अभिनेत्री आहे जबाबदार? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नाना पाटेकर यांच्या खासगी आयुष्याची चर्चा... कायम वादाच्या भोवऱ्यात असतात नाना पाटेकर?

Nana Patekar : 'या' अभिनेत्रीमुळे घटस्फोट न घेता पत्नीपासून वेगळे राहतात नाना पाटेकर?
Follow us
| Updated on: Nov 28, 2023 | 2:30 PM

मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : ‘वेलकम’, ‘तिरंगा’, ‘नटसम्राट’, ‘यशवंत’, ‘काला’, ‘परिंदा’, ‘अग्नीसाक्षी’ यांसारख्या अनेक सिनेमांच्या माध्यमातून अभिनेते नाना पाटेकर यांनी चाहत्यांच्या मनावर आणि सिनेविश्वावर राज्य केलं. आज देखील नाना पाटेकर यांना मोठ्या पडद्यावर पाहाण्यासाठी चाहते उत्सुक असतात. वयाच्या 72 व्या वर्षी देखील नाना पाटेकर तितक्याच उत्साहाने आणि आनंदाने अभिनय करतात. नाना पाटेकर यांना प्रोफेशनल आयुष्यात प्रचंड यश मिळालं. आजही नाना पाटेकर यांचं इंडस्ट्रीमध्ये असलेलं स्थान कोणी घेऊ शकलं नाही. पण खासगी आयुष्यात मात्र नाना पाटेकर यांनी अनेक चढ – उतारांचा सामना करावा लागला. सध्या सर्वत्र नाना पाटेकर यांच्या वैवाहिक आयुष्याची चर्चा रंगलेली आहे.

नाना पाटेकर यांनी वयाच्या 27 व्या वर्षी निलकांती यांच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त राहाण्याचा निर्णय घेतला. नाना पाटेकर आणि निलकांती घटस्फोट न घेता विभक्त राहात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून निलकांती आणि नाना पाटेकर विभक्त राहात आहेत. पण त्यांच्या नात्याच्या चर्चा कायम रंगलेल्या असतात.

रिपोर्टनुसार, नाना पाटेकर यांच्या प्रेमप्रकरणांबद्दल कळल्यानंतर निलकांती यांनी त्यांच्यापासून विभक्त राहाण्याचा निर्णय घेतला. एककाळ असा होता, जेव्हा फक्त बॉलिवूडमध्ये नाही तर, चाहत्यांमध्ये देखील अभिनेत्री मनिषा कोईराला आणि नाना पाटेकर यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या. नाना पाटेकर यांच्या अफेअरबद्दल कळल्यानंतर निलकांती घर सोडून गेल्या… असं अनेकदा समोर आलं.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, रंगणाऱ्या चर्चा फक्त आणि फक्त अफवा आहेत.. असं खुद्द नाना पाटेकर म्हणाले होते. निलकांती यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्या देखील रंगभूमी कलाकार होत्या. नाना पाटेकर आणि निलकांती यांची पहिली ओळख रंगमंचावरच झाली होती. निलकांती उत्तम अभिनेत्रीसोबतच लेखक देखील होत्या.

निलकांती तेव्हा अभिनयासोबतच एका बॅंकेत नोकरी देखील करत होत्या. तेव्हा निलकांती यांचं वेतन 2 हजाप 500 रुपये होतं… एका मुलाखतीत खुद्द नाना पाटेकर यांनी ही गोष्ट सांगितली होती. नाना पाटेकर आणि निलकांती यांना एक मुलगा आहे. त्याच्या मुलाचं नाव मल्हार पाटेकर असं असून त्याचं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस आहे. मल्हाप पाटेकर लाईमलाईटपासून दूर असतो.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.