कंगनाला महिला CISF जवानाने लगावली कानशिलात, नाना पाटेकर म्हणाले, ‘वाईट आहे पण…’
Nana Patekar On Kangana Ranaut | कंगना रनौत विजयाचा आनंद साजरा करत CISF महिला जवानाने लगावली कानशिलात, अनेकांनी केला विरोध, नाना पाटेकर म्हणाले, 'वाईट आहे पण...', सध्या सर्वत्र कंगना रनौत हिची चर्चा... सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल
अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत विजयाचा आनंद साजरा करत असतानाच एका महिला CISF जवानाने तिला कानशिलात लगावली. कंगना चंदीगड विमानतळावर असताना तिला महिला CISF जवानाने कानशिलात लगावली. घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. कंगनाच्या कानशिलात लगावण्याऱ्या महिला CISF जवानाचे नाव कुलविंदर कौर आहे. कंगना भाजपच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी विमानाने दिल्लीला येत असताना ही घटना घडली.
कंगना हिच्यासोबत घडलेल्या घटनेचा अनेकांनी विरोध केला आहे तर, अनेकांनी महिला CISF जवानाची साथ दिला आहे. आता यावर दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 7 जून रोजी नाना पाटेकर दिल्ली याठिकाणी पोहोचले होते. तेव्हा एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी येणारी सरकार आणि कंगना हिच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं.
नवी सरकार आल्यानंतर देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल का? यावर नाना पेटकर म्हणाले, ‘आमच्याकडून तर प्रत्येक गोष्ट सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल… गेल्या सरकारने चांगलं काम केलं आहे. येणारी सरकार देखील चांगलं काम करेल…’ असा विश्वास नाना पाटेकर यांनी व्यक्त केला.
कंगना हिच्याबद्दल विचारण्यात आल्यावर नाना पेटकर म्हणाले, ‘मला कंगना हिच्यासोबत काय झालं खरंच माहिती नाही. पण जे झाले ते चुकीचं आहे. असं नाही व्हायला हवं. पण ती चांगलं काम करेल अशी आशा करतो… आता सर्वकाही चांगलं होणार आहे. कारण विरोधक देखील तगडे आहे. त्यामुळे सगळे मिळून चांगलं काम करतील…’ असं देखील नाना पाटेकर म्हणाले.
सांगायचं झालं तर, सर्वत्र कंगना हिला महिला CISF जवानाने लगावलेल्या कानशिलाची चर्चा रंगली आहे. यावर अभिनेत्री भावना देखील व्यक्त केल्या. तर बॉलिवूडकरांनी धरलेल्या मौनानंतर अभिनेत्रीने पोस्ट केली. त्यानंतर अनेकांनी कंगना हिचं समर्थन केलं आहे.
हल्ला झाल्यानंतर काय म्हणाली कंगना?
विमानतळावर घडलेल्या घटनेनंतर कंगनाने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली “दिल्लीला जाताना चंदीगड विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान एका महिला सीआयएसएफ कॉन्स्टेबलने माझ्या कानशिलात लगावली आणि मला शिवीगाळ केली. मी कारण विचारल्यानंतर ती म्हणाली, तिने मला ती शेतकरी आंदोलनाची समर्थक असल्याचं सांगितलं.’ सध्या सर्वत्र कंगना हिची चर्चा रंगली आहे.