Farmhouse | नाना पाटेकरांपासून ते सलमान – दीपिका हिच्यापर्यंत ‘हे’ सेलिब्रिटी भव्य फार्महाऊसचे मालक
Farmhouse | मुंबईत आलिशान घर, कोट्यवधींची संपत्तीच नाही तर, 'हे' बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत भव्य फार्महाऊसचे मालक... सध्या सर्वत्र सेलिब्रिटींच्या रॉयल आयुष्याची चर्चा...
मुंबई : 13 सप्टेंबर 2023 | बॉलिवूड सेलिब्रिटी कायम त्यांच्या रॉयल लाईफ स्टाईलमुळे चर्चेत असतात. सेलिब्रिटींचे आलिशान घर, संपत्ती, महागड्या गाड्या… सेलिब्रिटींच्या इत्यादी महागड्या गोष्टी अनेकांना आकर्षित करतात. एवढंच नाही तर, सेलिब्रिटींकडे मुंबईत आलिशान घर, कोट्यवधींची संपत्तीच नाही तर भव्य फार्महाऊस देखील आहे. नाना पाटेकर, सलमान खान, दीपिका पादुकोण यांच्यासोबतच अन्य बॉलिवूड सेलिब्रिटी देखील आलिशान फॉर्महाऊसचे मालक आहे. ज्याठिकाणी सेलिब्रिटी अनेकदा कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जात असतात. सध्या सर्वत्र सेलिब्रिटींच्या आलिशान फॉर्महाऊसची चर्चा रंगली आहे.
नाना पाटेकर – नाना पाटेकर महाराष्ट्रातील खडकवासला येथील फार्म हाऊसमध्ये राहत होते. लाइमलाइटपासून दूर राहणारे नाना त्यांच्या फार्म हाऊसमध्ये साधे आयुष्य जगतात. दगडांनी बनवलेले नाना पाटेकरा यांचं हे फार्म हाऊस अतिशय सुंदर आहे. त्यांच्या फार्महाऊसचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
सलमान खान – पनवेल याठिकाणी सलमान खान याचा फार्महाऊस आहे. सलमान स्वतःचा वाढदिवस फार्महाऊसमध्ये माठ्या थाटात साजरा करतो. सलमान खान त्याच्या फार्महाऊसमध्ये शेती देखील करतो. अभिनेत्याच्या फार्महाऊसचं नाव ‘अर्पिता’ असं आहे. अर्पिता सलमान खान याच्या लहान बहिणीचं नाव आहे.
सुनील शेट्टी – खंडाळा याठिकाणी सुनील शेट्टी याचं आलिशान फार्महाऊस आहे. फार्महाऊसमध्ये अभिनेत्याची लेक अथिया शेट्टी हिचं लग्न झालं. सुनील शेट्टी अनेकदा फार्महाऊसचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. १७ वर्ष जुन्या या फार्महाऊसचं नाव ‘जहान’ असं आहे.
विराट कोहली – अनुष्का शेट्टी – विराट आणि अनुष्काला समुद्र आवडतो, म्हणूनच महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या अलिबागमध्ये त्यांचं आलिशान फार्म हाऊस आहे. लॉकडाऊन दरम्यान, विरुष्काने या फार्महाऊसमध्ये बराच वेळ घालवला होता.
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण – दीपिका – रणवीर देखील आलिशान फार्महाऊसचे मालक आहेत. त्यांच्या फार्महाऊसची किंमत तब्बल २२ कोटी रुपये आहे. फार्महाऊसमध्ये एकत्र वेळ व्यतीत करणं दोघांना प्रचंड आवडतं.
नाना पाटेकर यांचा आगामी सिनेमा
विवेक अग्निहोत्री यांच्या आगामी ‘द व्हॅक्सिन वॉर’ या सिनेमात नाना पाटेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमाची कथा महामारीच्या काळात COVID-19 लस तयार करण्याच्या शर्यतीत भारताच्या योगदानाभोवती फिरत आहे. सध्या सर्वत्र नाना पाटेकर स्टारर ‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमाची चर्चा सुरु आहे.