मारल्याबद्दल नानांविरोधात कारवाई करणार का? ‘त्या’ चाहत्याची प्रतिक्रिया समोर

शूटिंगदरम्यान नाना पाटकरांजवळ एक चाहता सेल्फी क्लिक करण्यासाठी येतो. त्याचवेळी शूटिंगमध्ये असलेले नाना रागाच्या भरात त्याला डोक्यावर मारतात. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. नानांचं हे वागणं बरोबर नाही, अशी प्रतिक्रिया चाहते देत आहेत.

मारल्याबद्दल नानांविरोधात कारवाई करणार का? 'त्या' चाहत्याची प्रतिक्रिया समोर
Nana Patekar slapped fanImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Nov 17, 2023 | 3:48 PM

वाराणसी : 17 नोव्हेंबर 2023 | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. वाराणसमधील एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांनी चाहत्याच्या डोक्यात टपली मारली. संबंधित चाहता त्यांच्याकडे सेल्फी क्लिक करण्यासाठी गेला होता. मात्र नानांनी त्याला मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अनेकांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली. या प्रकरणानंतर नानांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत जाहीर माफीसुद्धा मागितली आहे. आता ज्या चाहत्याला नानांनी मारलं, त्याची प्रतिक्रिया समोर आली आहे. संबंधित चाहता वाराणसीच्या घाटावर गंगा स्नानासाठी गेला होता. त्यावेळी त्याची नजर नानांवर पडली. आपल्या आवडत्या हिरोसोबत फोटो काढण्याचा मोह त्याला आवरला नाही आणि तो थेट नानांजवळ सेल्फीसाठी गेला.

काय म्हणाला चाहता?

“माझं नाव राज सुनकर आहे. मी वाराणसीमधील तुलसीपूर इथला राहणारा आहे. नाना पाटेकर यांनी मलाच मारलं होतं. मी गंगास्नान करण्यासाठी घाटावर गेलो तेव्हा माझी नजर शूटिंगवर पडली. मी काही वेळ प्रतीक्षा केली आणि त्यानंतर त्यांच्याकडे जाऊन फोटोची विनंती केली. मात्र त्यांनी मला फोटो क्लिक करण्यास नकार दिला आणि मला मारून तिथून बाहेर काढलं. मला चित्रपटामधील कोणतीच भूमिका मिळाली नव्हती. पण घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण मोहल्लामध्ये माझा अपमान झाला. शूटिंग संपल्यानंतरही त्यांनी मला बोलावलं नाही. मी थेट तिथून निघून गेलो”, असं तो म्हणाला.

नानांवर कारवाई होणार का?

याविषयी तो चाहता पुढे म्हणाला, “मी नाना पाटेकर यांचा खूप मोठा चाहता आहे. त्यांच्या बाऊंसरने मला रोखलं होतं, पण मी त्यांना खूप पसंत करतो. ते इतके मोठे स्टार आहेत, म्हणून मी त्यांच्यासोबत एक फोटो काढण्याचा विचार केला होता. पण जेव्हा मी त्यांच्याजवळ गेलो तेव्हा त्यांनी मला मारलं. आधी जेव्हा मी त्यांना लांबून पाहिलं, तेव्हा मला विश्वास बसत नव्हता, पण जवळ गेल्यावर मला समजलं की ते नाना पाटेकरच आहेत. पण याप्रकरणी त्यांच्यावर कोणतीही कारवाई व्हावी अशी माझी इच्छा नाही.”

हे सुद्धा वाचा

नाना पाटेकरांचा माफीनामा

चाहत्याला टपली मारण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नाना पाटेकर यांच्यावर प्रचंड टीका झाली. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आणि जाहीर माफी मागितली. “चित्रपटात एक सीन असा होता, ज्यामध्ये माझ्याजवळ एक मुलगा फोटो क्लिक करण्यासाठी येतो आणि मी त्याला कानाखाली मारतो. जो मुलगा माझ्याजवळ आला, तो सेटवरचाच असल्याचं मला वाटलं होतं. म्हणून मी शूटिंगच्या ओघात त्याला मारलं. पण नंतर मला समजलं, की तो सेटवरचा मुलगा नसून माझा एक चाहता होता. मी याप्रकरणी जाहीर माफी मागतो”, अशा शब्दांत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.