Nandita Dutta Case: कोलकाता अश्लील चित्रपट प्रकरण, ‘नॅन्सी भाभी’ने सांगितली या काळ्या जगतातील गुपित!
कोलकाता अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आलेली ‘नॅन्सी भाभी’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री नंदिता दत्ता (Nandita Dutta) आणि तिच्या साथीदारांनी पोलिसांच्या चौकशीत अनेक धक्कादायक रहस्ये उघड केली आहेत.
मुंबई : कोलकाता अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आलेली ‘नॅन्सी भाभी’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री नंदिता दत्ता (Nandita Dutta) आणि तिच्या साथीदारांनी पोलिसांच्या चौकशीत अनेक धक्कादायक रहस्ये उघड केली आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण चार जणांना अटक केली आहे. यामध्ये नंदिता दत्ता, फोटोग्राफर मैनाक घोष, फोटोग्राफर शुभंकर डे आणि अभिनेता स्नेहाशिष बल यांच्याशिवाय इतर अनेकांचा समावेश आहे.
या सर्वांना कोलकात्यात अश्लील चित्रपटांचे शूटिंग आणि ते व्हिडीओ वेबसाईट्सवर अपलोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांनी अश्लील चित्रपट बनवल्याच्या प्रकरणानंतर, कोलकात्यातही एक अश्लील चित्रपट बनवण्याच्या प्रकरणाचा हा मोठा खुलासा झाला होता. आरोपी मॉडेल्सने आरोप केला होता की, नंदिता दत्ता राज कुंद्राच्या अॅपसाठी काम करत होती. परंतु, नंदिता दत्ताने पोलीस चौकशीत हा आरोप फेटाळून लावला.
न्यू टाऊनमधील एका हॉटेलमध्ये झाले चित्रीकरण
पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे की, आरोपीने 26 जुलै रोजी न्यू टाऊनमधील एका हॉटेलमध्ये फोटोशूट केले आणि एका तरुणीला अश्लील चित्रपट बनवण्यास भाग पाडले. तक्रारदारानुसार, अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचा नग्न फोटो त्याच्या अॅपमध्ये अपलोड करण्यात आला होता. तथापि, पोलीस सूत्रांनी सांगितले की, आरोपींनी ज्या साईटवर हे व्हिडीओ अपलोड केले होते, त्या साईटबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. पोलीस त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. बारासाट न्यायालयात हजर करण्यापूर्वी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना नंदिता दत्ता म्हणाली की, हे एक सामान्य न्यूड शूट होते, अश्लील नाही आणि न्यूड चित्रीकरण करणे अश्लील नाही. जर हे असे असते, तर वर्षानुवर्षे चित्रपटांमध्ये असे चित्रीकरण कसे चालले? आम्ही कोणतीही चूक केलेली नाही. मुंबईत एका पॉर्न स्कँडलमध्ये अडकलेल्या शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रासोबत तिचा कोणताही संबंध नसल्याचा दावाही नंदिताने केला.
नंदिता जाहिराती करून नवीन मॉडेल्स बोलवत
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदिता अश्लील चित्रपटांचे रॅकेट चालवत असे. ती फेसबुकवर जाहिराती करून नवोदित मॉडेल्सना आकर्षित करायची. त्यानंतर मैनाक आणि नंदिता त्यांना वेगवेगळ्या स्टुडिओ आणि हॉटेल्समध्ये घेऊन आक्षेपार्ह फोटो काढण्यास भाग पाडत असत. नंदिताने फेसबुकवर एक मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख करून दिली आहे. तिच्या फेसबुक प्रोफाईलवर बोल्ड फोटोशूटची छायाचित्रेही आहेत. नंदिताच्या फेसबुक फ्रेंड लिस्टमध्ये टॉलिवूडचे अनेक प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शकही आहेत. फेसबुकवर नंदिताचे सुमारे 23,000 फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवरही तिच्या फॉलोअर्सची संख्या कमी नाही.
हेही वाचा :
किशोर कुमारांची झाली होती 4 लग्न, त्यातील एक आता मिथुन चक्रवर्तींची पत्नी!
‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी राज कुंद्राने शिल्पा शेट्टीला दिली होती 100 कोटींची भेट!