AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेव्हा स्मृती इराणींसमोरच मोदी म्हणतात ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’

49 मुलांची राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून 22 मुलांना राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने गौरवण्यात आलं.

जेव्हा स्मृती इराणींसमोरच मोदी म्हणतात 'क्योंकि सास भी कभी बहू थी'
Follow us
| Updated on: Jan 24, 2020 | 4:25 PM

नवी दिल्ली : टीव्ही अभिनेत्री ते केंद्रीय मंत्री हा स्मृती इराणी यांचा प्रवास सर्वांनाच परिचित आहे. ज्या मालिकेमुळे स्मृती इराणींना लोकप्रियता मिळाली त्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’चा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Narendra Modi Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi) उपस्थित चिमुरड्यांना अवाक केलं.

राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या मुलांची पंतप्रधानांनी भेट घेतली. या भेटीत मोदींनी मुलांना अनेक प्रश्न विचारले. बोलता बोलता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासमोरच ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेचा उल्लेख केला आणि एकच हशा पिकला.

जेव्हा तुमची आई दूध घेऊन येते. त्यावेळी तिच्या हातात एखादं काम असतं किंवा तिची आवडती टीव्ही सिरीअल सुरु असते. त्यावेळी लवकर लवकर दूध पिऊन घे, असं आई मुलांना सांगते. तुम्हीही औषध दिल्यासारखं दूध पिऊन घेता. कारण आईला सिरीअल बघायची असते. त्यावेळी कोणती मालिका असं विचारत ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ असा उल्लेख मोदींनी केला. त्यावर स्मृती इराणींसह शौर्य पुरस्कार विजेत्या मुलांना हसू अनावर झालं. (Narendra Modi Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi)

मुलं देशाचं भविष्य आहेत. जेव्हा मी तुमच्या शौर्यकथा ऐकतो, तेव्हा मला प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. माझ्यासह प्रत्येकालाच तुमचा अभिमान वाटतो. देशातील सर्व मुलांच्या शौर्यकथा मी जगाला सांगेन, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

तुम्हाला आईची आठवण येत नाही का, असा प्रश्न एका शौर्य पुरस्कार विजेत्या चिमुरड्याने पंतप्रधानांना विचारला. तेव्हा, मला जेव्हा आईची आठवण येते तेव्हा सर्व थकवा दूर होतो, असं उत्तर मोदींनी दिलं.

पाणी कसं प्यावं, यावरही नरेंद्र मोदींनी मुलांशी चर्चा केली. पाणी नेहमी बसून प्यावं. दररोज व्यायाम करावा, असा सल्ला मोदींनी दिला. 49 मुलांची राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून 22 मुलांना राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने गौरवण्यात आलं. शौर्य पुरस्कार प्राप्त झालेल्या 22 मुलांमध्ये 10 मुली आणि 12 मुलांचा समावेश आहे.

राष्ट्रीय पुरस्कारांची व्याप्ती वाढली आहे. शौर्य पुरस्कार विजेत्या मुलांकडे अख्ख्या देशाचं लक्ष आहे. तुम्ही त्यांच्यासाठी हिरो आहात, असंही मोदी म्हणाले. तुम्ही यशस्वी व्हाल, तेव्हा आपलं लक्ष्य काय आहे, हे विसरु नका. नवनव्या संधीच्या शोधात राहा. मेहनत करण्यापासून स्वतःला रोखू नका, असा सल्लाही नरेंद्र मोदींनी मुलांना दिला.

Narendra Modi Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi

पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?.