देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेची लेक होती ‘ही’ अभिनेत्री, ब्राह्मण वडिलांनी स्वीकारला होता इस्लाम
Actress Life | देहविक्रीचा व्यवसाय करणारी महिला, लेकीला प्रसिद्ध अभिनेत्री करण्याचं तिचं स्वप्न, अभिनेत्रीच्या ब्राह्मण वडिलांनी स्वीकारला होता इस्लाम कारण... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या चर्चा... वयाच्या 51 वर्षी अभिनेत्री कर्करागामुळे झालं निधन...
गेल्या काही दिवसापासून ‘हीरामंडी’ या वेब सीरिजची चर्चा तुफान रंगली आहे. सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त ‘हीरामंडी’ सीरिजची चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये एक अशी अभिनेत्री होऊन गेली, जिची आई देहविक्रीचा व्यवसाय करायची आणि ब्राह्मण वडिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून दिवंगत अभिनेत्री नरगिस आहेत.
नरगिस यांचं खरं नाव फातिमा राशिद असं होतं. नरगिस यांची आई जद्दनबाई फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय कंपोजर होत्या. एवढंच नाहीतर, एक काळ असा देखील होता, जेव्हा त्यांची ओळख तवायफ म्हणून होती. नरगिस यांच्या वडिलांचं नाव मोहनचंद उत्तमचंद त्यागी असं होतं. जे एक ब्राह्मण उद्योजक होते.
मोहनचंद उत्तमचंद त्यागी हे पहिल्या नजरेतच जद्दनबाई यांच्या प्रेमात पडले. त्यानंतर जद्दनबाई यांच्यासोबत लग्न करण्यासाठी मोहनचंद उत्तमचंद त्यागी ब्राह्मण धर्माचा त्याग करत इस्लाम स्वीकारला आणि जद्दनबाई यांच्यासोबत लग्न केलं. मोहनचंद उत्तमचंद त्यागी यांच्यासोबत जद्दनबाई यांचं तिसरं लग्न होतं.
रिपोर्टनुसार, तेव्हा जद्दनबाई देहविक्रीचा व्यवसाय करायच्या… जद्दनबाई यांची मुलगी म्हणजे नरगिस यांना डॉक्टर व्हायचं होतं. पण आपल्या मुलीने प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री व्हावं अशी जद्दनबाई यांची इच्छा होती. फार कमी वयात नरगिस यांनी करियरला सुरुवात केली.
रिपोर्टनुसार, जद्दनबाई यांच्यावर कर्जाचा डोंगर होता. कर्जाची परतफेड करण्यासाठी जद्दनबाई यांनी मुलगी नरगिस हिला सिनेमांमध्ये काम करण्यास सांगितलं. नरगिस यांनी अनेक सिनेमांमध्ये भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. तेव्हा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत नरगिस अव्वल स्थानी होत्या.
अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारल्यानंतर नरगिस यांनी ‘मदर इंडिया’ सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावली आणि चाहत्यांच्या मनात घर केलं. यशाच्या शिखरावर असताना नरगिस यांनी अभिनेते सुनील दत्त यांच्यासोबत लग्न केलं.
अभिनेता संजय दत्त याची आई म्हणजे नरगीस… नरगिस यांनी वयाच्या 51 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नरगीस यांचं निधन कर्करोगामुळे झालं. संजय दत्त कायम आईबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करतो.